पुजा कुरंजेकर चमु गणतंत्र दिवस स्पर्धेत प्रथम स्थानावर ; अर्चना उके शाखेत प्रथम.
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या नागपूर विभागा अंतर्गत दिनांक ९ – २५ जानेवारी या कालावधीत गणतंत्र दिवस स्पर्धा साकोली शाखेत घेण्यात आली. या स्पर्धेत शाखेतील सर्वच अभिकर्त्यानी भाग घेतला होता. विशेषतः ही स्पर्धा अतिशय महत्वाची असून या स्पर्धेत सी एल आय ग्रुप लीडर चे वर्चस्व पणाला लागले होते. त्यामध्ये पुजा कुरंजेकर चमुतील अभिकर्त्यांनी स्पर्धेत पूर्ण क्षमतेने १०४ पॉलिसी पुर्ण करीत शाखेत प्रथम स्थानावर बाजी मारीत अर्चना उके शाखेत प्रथम क्रमांकावर आली. गणतंत्र दिनी या प्रथम विजेता चमुचा मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला.
भारतीय आयुर्विमा महामंडळ साकोली शाखेत या सोहळ्याला उपस्थित शाखाधिकारी कळमकर, लाखनी शाखेचे पाठराबे, सहा.शाखाधिकारी उमेश लिंगलवार, किशोर डोंगरे हे या सत्कार समारंभास उपस्थित होते. कार्यक्रमात जीवन विमा समुहातील अभिकर्त्यांनी साकोली शाखेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साकोली शाखा गणतंत्र दिवस स्पर्धेत पुजा कुरंजेकर चमुतील अर्चना उके यांचा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला चमुतील अर्चना उके, प्रमोद गजभिये, रोशन कापगते यांनी स्पर्धेत शिल्ड मिळविले. प्रमोद ठाकरे व नरेश कुरंजेकर यांनी ट्रॉफी मिळविली.
गणतंत्र दिवस स्पर्धेत पुजा कुरंजेकर ग्रुप प्रथम स्थानावर आला त्याचे श्रेय ग्रुप मधील सर्व अभिकर्त्याना दिले आहे व विशेषतः शाखेतील उच्चश्रेणी सहाय्यक चंदु लिखार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज महत्वाच्या गणतंत्र दिवस स्पर्धेत ही चमु पहिल्या स्थानावर आली यांचेही अनमोल श्रेय त्या सर्व पॉलिसी धारकांना दिले ज्यांच्या सहकार्यामुळे आज समुहाचे नाव मोठे झाले आहे. या स्पर्धेत समूहातील नवीन कुशल महिला अभिकर्ता अर्चना उके यांनी २७ पॉलिसी करीत साकोली शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला, अर्चना उके यांच्या मध्ये प्रथम येण्याची जिद्द हेच त्यांच्या यशाचे प्रमाण आहे असे प्रतिपादन चमु मुख्य सल्लागार पुजा कुरंजेकर यांनी केले.
त्यांच्या स्वतःचा कार्यामुळे व समुहातील अन्य विमा प्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच गणतंत्र दिवस स्पर्धेत पुजा कुरंजेकर समुह स्पर्धेत प्रथम स्थानावर आहे. गणतंत्र दिवस स्पर्धेत एल आय सी अधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी समुह लीडर पुजा कुरंजेकर यांना दिले आहे.