पुणे क्राईम : ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्षावर केला वार, पहा काय आहे कारण सविस्तर.

तुम्ही जर पुण्यातील ससून रुग्णालयात कधी गेला असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विद्येचे माहेर घर असणारे पुणे पुन्हा एकदा हादरल आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. तुषार हंबीर हा कुख्यात गुन्हेगार असून गेल्या वर्षीपासून तो तुरुंगात आहे मात्र दहा दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे ससून रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो मोक्कामध्ये येरवडा कारागृहात बंद आहे. गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या ठिकाणी येऊन त्यांनी हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत त्या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यासोबतच्या झटापटीत हा पोलीस कर्मचारीच जखमी झाला आहे.
त्यामुळे हल्लेखोर पळून गेले, घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि याचा तपास सुरू केला मात्र अजूनही हल्ले करून हल्लेखोरांना पोलीस पकडू शकले नाहीत दुसरीकडे ससून रुग्णालयाच्या सुरक्षेच्या जबाबदारीच्या बाबतीत बंडगार्डन पोलिस अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. तुषार हंबीर याच्यावरती हल्ला होण्याची ही पहिली घटना नाही या आधीही 2019 मध्ये येरवडा कारागृहात कैद्यांचा हाणामारीत हिंदू राष्ट्र सेनेचा संघटक सराईत गुन्हेगार हा जखमी झाला होता.