धक्कादायक घटना: कचऱ्याची पिशवी उघडताच समोर दिसलं अस काही, वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
दिवाळीच्या धामधुमीत सध्या शहरातील कचरा मोठ्या प्रमाणावर जमा होत असल्याने महापालिकेने घंटागाड्यांकडून हा कचरा पाथर्डी फाटा येथील कचरा डेपोत टाकला जात आहे. एका घंटागाडीतून आलेल्या कचऱ्याचे कचरावेचक हे विलगीकरण करत असतानाच, त्यांना एका पिशवीत संशयास्पद वस्तु असल्याचे लक्षात आले. एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत कापडात गुंडाळून ठेवलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर कचरावेचक महिलेने सदर पिशवी उघडली असता, त्यात मयत स्त्री जातीचे अंदाजे एक दिवसाचे अर्भक असल्याचे लक्षात आले.
महापालिकेच्या पाथर्डी फाटा येथील खत प्रकल्पातील कचऱ्यात एक स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या स्त्री अर्भकाला एका गोणित गुंडाळून ते घंटागाडीत टाकल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देवून अर्भकाची पाहणी केली असता, सदरचे अर्भक हे ३० ते ३२ आठवड्याचे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या वतीने इंदीरानगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक संबंधातून अर्भक जन्माला आले असावे, असा संशय पोलिसांना असून पोलीस निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.महापालिकेच्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली असता,सदरचे स्त्री अर्भक हे ३० ते ३२ आठवड्याचे असून २४ तासाच्या आतच जन्माला आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी प्राथमिक तपासणी केल्यानंतर हे अर्भक पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात सदर अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे खळबड उडाली आहे.
महापालिकेच्या या खतप्रकल्पावर दोनशे घंटागाड्या येत असून नेमक्या कोणत्या घंटागाडीतून हे अर्भक या ठिकाणी आले, याचा पालिकेने शोध सुरू केला आहे. ११ ते १२ वाजेच्या दरम्यान पंचवटी आणि नाशिक पूर्व या विभागातून आठ ते १० घंटागाड्या येथे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. त्यात कचऱ्याच्या वर्गीकरणावरून सदरचे अर्भक हे नाशिक पूर्व विभागाच्या घंटागाड्यातून आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.