राजकारणातून समाजकारण, समाजकारणातून अध्यात्म, खा. लंके यांची सेवाभावाची परंपरा मोहटादेवीतही..

हजारो भाविकांसाठी अन्नदान सेवा, पंढरपूर अन्नछत्रासारखी संकल्पना मोठा देवी गडावर; भाविकांमध्ये उत्साह, वातावरण भक्तिमय.
पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवानिमित्त भाविक भक्तांसाठी भव्य खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम माननीय खासदार श्री. निलेशजी लंके साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
शनिवार, दि. २६सप्टेंबर २०२५ रोजी महाप्रसाद वाटपाची सुरुवात झाली , आता ही सेवा १ऑक्टोबर पर्यंत सुरूच राहणार आहे , सकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या गर्दी होती,या उपक्रमामुळे हजारो भाविकांना खिचडी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महाप्रसादाचे वाटप मोहटेगाव (पाथर्डी) येथील मोहटादेवी गडावर सकाळी ९.०० वाजता सुरू आहे. या सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी आपला मावळा व निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व सहकारी यांना उपस्थित होते. विशेष म्हणजे, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये दरवर्षी खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून उभारले जाणारे भव्य अन्नछत्र हे देशभरात गाजते. याच धर्तीवर आता मोठा देवी गडावरही भक्तांसाठी भव्य अन्नछत्राची संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे.
खा. निलेश लंके हे स्वतः मोहटादेवीचे भक्त असून, ते राजकारण, समाजकारण आणि अध्यात्म यांची सांगड घालून जनसेवा करण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला भक्तीभावाचा अनोखा स्पर्श असतो. “देवीच्या चरणी सेवा आणि भक्तांसाठी अन्नदान” या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम नवरात्र उत्सवातील एक मोठे आकर्षण ठरत असून, भाविकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.