अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोयगाव येथे तालुक्यातील सर्व सभासदांची सभा संपन्न.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि.१० (प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोयगाव येथील कार्यालयात तालुक्यातील सर्व सभासदांची सभा घेण्यात आली. या सभेस मार्गदर्शन करण्याकरीता जिल्हा संघटक धनंजय मुळे उपस्थित होते.मागील सभेचा वृतांत तालुका अध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी यांनी वाचून दाखविला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोयगाव तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक सभासदांनी केलेले अर्ज मा.जिल्हा संघटक यांनी जिल्हा कार्यकारिणी समोर ठेऊन त्यास सर्वानुमते संमतीने सोयगाव तालुका कार्यकारिणी जिल्हा संघटक धनंजय मुळे यांनी घोषित केली आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
गाव तेथे ग्राहक पंचायत असा कार्यक्रम सोयगाव तालुक्यात राबवण्याचा संकल्प केला असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. नवनिर्वाचित तालुका संघटक सुधीर कुलकर्णी यांनी प्रत्येक गावात ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी तालुक्यासाठी एक अभ्यासवर्ग घेण्यात यावा अशी मागणी जिल्हा संघटक धनंजय मुळे यांच्याकडे केली असता माहे मे २०२३ मध्ये अभ्यास वर्गाचे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन धनंजय मुळे यांनी दिले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सोयगाव तहसीलचे नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे उपस्थित होते. यावेळी प्रभाकर कुलकर्णी यांनी २०२४ या वर्षी अखिल भारतीय ग्राहक पंचायतला ५० वर्ष होत असून त्यानिमित्ताने जेथे जेथे ग्राम पंचायत तेथे तेथे ग्राहक पंचायत असा नारा त्यांनी दिला. नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी हाच नारा देत पुर्ण वर्ष काम करेन असे सर्वांच्या वतीने सांगीतले. कार्यक्रमासाठी सोयगाव येथील शेतकरी समूह उपस्थित होता पिक विमा अजून पर्यंत मिळाला नसल्याची तक्रार ग्राहक मंचाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे केली. शेख सुलेमान से उस्मान यांनी शेतकर्यांना ग्राहक पंचायत यासाठी निश्चित कार्य करेल आणि मार्च अखेर पर्यंत न्याय मिळेल असे सर्व शेतकरी बांधवांना सांगीतले. तसेच गरज पडल्यास ग्राहक पंचायत चे कार्यकर्ते आंदोलन करतील असा विश्वास योगेश बोखारे यांनी शेतकरी बांधवांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर कुलकर्णी यांनी केले तर तर आभार प्रदर्शन सुनील काळे यांनी केले.
सोयगाव तालुका कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष प्रभाकर बळवंत कुलकर्णी, उप तालुका अध्यक्ष संजय शहापूरकर, तालुका सचिव हितेश कुलकर्णी, तालुका संघटक सुधीर कुलकर्णी, सदस्य विकास देसाई, गोकुळ रोकडे, शिवाजी दौड, शेख सुलेमान शेख उस्मान. सुनिल काळे, योगेश बोखारे आदि सदस्यांची निवड करण्यात आली.