एसटी कंडक्टरचा चावटपणा ! १७ वर्षीय शाळकरी मुलीसोबत बसमध्ये नको ते केलं, शेगावची घटना.
स्त्री सुरक्षित नाही याची प्रचिती वारंवार येते आह्रे, असाच एक धक्कादायक घडला आहे, एसटीमध्ये धक्कादयक प्रकार घडला, गाव खेड्यांमध्ये सुरक्षित वाहन म्हणून एसटीकडे पाहिले जात, मात्र याच एसटीत आपल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत याचा प्रत्यय आलाय एका एसटी कंडक्टर एका मुलीसोबत चावटपणा केला,एसटी महामंडळाच्या सेवेकडे आजही राज्यामध्ये एक विश्वासाच्या नजरेने पाहिल्या जाते. असंख्य गावखेड्यापर्यंत पोहोचलेल्या या सर्व सामान्यांच्या लाल परीने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अनेक सवलती एसटी महामंडळाने विद्यार्थी ते वृद्धांसह इतर घटकांना पोहोचवल्या आहेत. दिवस रात्र सेवा देणाऱ्या या एसटीवर मात्र बुलडाण्यात एका कंडक्टरच्या कृत्याने शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींकरता शाळेपर्यंत जाण्याकरिता आजही गाव खेड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत एसटी हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी एसटी म्हणजे आपली लाल परी रोज तत्पर असते. सर्व वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी या लाल परीची आतुरतेने वाट पाहत असतात.
पण एका एसटी वाहकामुळे (कंडक्टर) काल शेगाव परिसरात संपूर्ण विभागावर शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली.जी विद्यार्थिनी रोज शाळेमध्ये येजा करत होती, तिला कल्पना देखील नव्हतं की आज तिच्यासोबत नेमकं काय घडणार आहे. पण प्रसंगावधान राखत मोठ्या हिमतीने तिने तोंड देत संपूर्ण घटना हाताळली. पीडित मुलीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. ४ फेब्रुवारीला म्हणजे काल पीडित मुलगी बसने पातूर्डा फाटा येथून शेगावला येत होती.
त्यावेळी बस कंडक्टर शिवशंकर प्रल्हाद वाघमारे (वय वर्षे ४४, एसटी डेपो, खामगाव) याने तिकीट काढण्याच्या बहाण्याने मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श केला. कंडक्टरने वारंवार स्पर्श केल्याने मुलीने जाब विचारला. तेव्हा कंडक्टरने मुलीला बसखाली उतरवून दिले.बसमध्ये घडलेला प्रकार पीडित मुलीने कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बस कंडक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.