Video Viral : पुणेरी बायकोचा जबरदस्त जुगाड, ट्रॅफिक मध्ये तिने पहा नवऱ्याला कशी मदत केली.
वाहतूक कोंडी , खड्डे आणि अपघात याचं एक सूत्र आहे , वाहनधारक या सूत्रीचा सामना करूनच प्रवास करावा लागतो, मोठ्या शहरामध्ये तर ट्राफिक जाम ही परंपरा झाली. यावर उपाय म्हणून अनेक वेळा मार्ग काढले मात्र यात काही बदल झाले नाही. विशेषत: ऑफिसमधून घरी येताना रस्त्यावर गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे ऑफिसमधून तुम्ही कितीही लवकर निघालात तरी घरी पोहोचेपर्यंत तुम्ही शारीरिकदृष्ट्या पार थकलेले असता.
याच ट्राफिकमध्ये अडकलेल्या एका गुणाच्या बायको ने अशी शक्कल लावली त्याच व्हिडियो viral होत आहे, एका पुणेरी बायकोनं जबरदस्त जुगाड शोधून काढला आहे. बाईक ट्राफिकमध्ये अडकलेली असताना तिने आपल्या नवऱ्याच्या हातांचं मालिश करून दिलं. ही घटना ट्रॅफिकमध्येच अडकलेल्या काही चाणाक्ष प्रवाशांना नजरेस पडली. त्यांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली अन् आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
पुणे हे भारतातील रहदारीत अग्रगण्य असणारे शहर आहे. पुण्यातील रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच भर पडली आहे. शहरातील प्रमुख चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा पुणेकरांना सामना करावा लागत आहे. यावर आता वाहतूक पोलिसांनी जालीम उपाय काढला आहे. शहरातील प्रमुख चौकात आता सिग्नलची प्रतीक्षा वेळ वाढवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
आधी सिग्नलला ९० ते १२० सेकेंद प्रतीक्षा वेळ होती आता ती वाढवून १५० ते १८० सेकंद इतकी करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास फायदा होणार आहे. आदीच रस्त्यांवरील खड्ड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना मेट्रोचे काम सुरु असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहनांच्या मोठ्या-मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांच्या या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.येत्या काळात रस्ते मोकळा श्वास घेतील अशी अपेक्षा आहे.