सातवी पास महिला का बनली टॅक्सी चालक? संघर्षमय प्रवास पाहून तुम्हाला मिळेल प्रेरणा.
जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो हा संघर्ष कधीच कुणाला चुकत नाही, एका महिलेने असाच संघर्ष करत आपला स्वतःचा असा एक व्यवसाय सुरू केला हा व्यवसाय नाही तर हा छंद म्हणता येईल मात्र आगळावेगळे काम आहे, बऱ्याचदा या कामांमध्ये तुम्ही पुरुषांना पाहत असाल मात्र या स्त्रीने स्वतः हा व्यवसाय सुरू केला कमी शिक्षणातून देखील न डगमगता ती समाजात पाय रोल उभी राहिली आणि सगळीकडे टॅक्सी चालक म्हणून ओळखली जाऊ लागली त्याचे सारिका यांची कहाणी आहे,काही महिला स्वेच्छेने काही कामाची, नोकरीची जबाबदारी स्वीकारतात तर काहींना प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत संसाराचा गाडा पुढे चालवण्यासाठी आश्चर्यकारक वाटणारी कामे स्विकारावी लागतात. अगदी अशाच परिस्थितीतून पुढे आलेल्या मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर सारिका रणदिवे या महिलेचा प्रवास देखील मोठा रंजक आहे.मुंबईची जीवन वाहिनी म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे.
त्याचप्रमाणे मुंबईच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या टॅक्सी देखील मुंबईचा विभाज्य घटक आहे. मात्र, मुंबईत चालणाऱ्या टॅक्सी या क्षेत्रावर नियमित पुरुष मक्तेदारी राहिलेली आहे. आजही मुंबईच्या काही विविध रंगाची टॅक्सी चालते त्यात 99 टक्के पुरुष ड्रायव्हर आहेत. मात्र, या कामाला छेद देण्याचं काम मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या सारिका रणदिवे यांनी केले आहे.पुरुषी मक्तेदारी असलेल्या टॅक्सी ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात मोठ्या जिद्दीने सारिका रणदिवे या गेल्या वर्षभरापासून मुंबईत टॅक्सी चालवत आहेत. सारिका रणदिवे या मानखुर्द परिसरात राहतात. सारिका या सातवी पास आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती ही हलाखीची होती. झाडू काम, काही घरांमध्ये घरकाम करण्याची कामे सारिका गेल्या अनेक वर्षांपासून करत होत्या. घरी पती तीन मुलं असून त्यांचे पती ही ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात. मात्र पती-पत्नी दोघेही नोकरी करत असूनही घरातला गाडा हाकणे कठीण झाले होते.त्यामुळे वेगळं काही करून चार पैसे पदरात पडता येतील का ?
याची चाचणी सारिका यांनी सुरू केली होती. सारिका या एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कामावरून परतत असताना जोराचा पाऊस सुरू होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे सारिकाच्या पायात चप्पल देखील नव्हती. जवळ छत्री नसल्यामुळे आडोसा घेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला पोहोचण्याची घाई सारिका करत असताना ही अवस्था पाहून पोपट धाते या गृहस्थांनी पाहिले. सारिका यांची अवस्था पाहून दाते यांनी त्यांना आधी चहा नंतर बिस्कीट खायला दिली. चहा घेता घेता त्यांच्याबद्दल सर्व माहिती त्यांनी विचारल्यानंतर त्यांना मदत करण्याचं आश्वासन धाते यांनी दिलं.2019 साली सारिका यांनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन ड्रायव्हिंग शिकण्याचे धडे घेतले. काही पैसे सारिका यांनी तर काही पैसे पोपट धाते यांनी दिले.
काही पैसे कामाच्या माध्यमातून त्यांनी जोडले होते. मात्र गाडी घ्यायला तेवढे पैसे पुरेसे नव्हते. म्हणून बँकेकडून लोन करत जुनी टॅक्सी त्याचे परमिट त्यांनी विकत घेतले. आणि मुंबईत सारिका टॅक्सी चालवू लागल्या.टॅक्सी चालवल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारायला मोठी मदतआधी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण चार घरात घर कामे करत होतो. मात्र आज अभिमानाने मुंबईत आपले स्वतःची टॅक्सी चालवत आहोत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया, दादर अशा परिसरात टॅक्सी चालवून आज आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत आहोत. टॅक्सी चालवल्यामुळे घराच्या आर्थिक परिस्थिती सुधारायला मोठी मदत झाली असल्याचे आता सारिका रणदिवे सांगतात.