खा. निलेश लंकेच्या जनसेवाला प्रकृतीने लावला ब्रेक; रूटीन चेकअपसाठी पुण्यात…

सप्रेम नमस्कार,
सततचे सार्वजनिक कार्यक्रम, आपणापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अविरत धावपळ आणि यावर्षीच्या तीव्र उष्णतेमुळे गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी आज मी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झालो आहे.
सद्यस्थितीत माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत पूर्वीप्रमाणे कार्यरत होईन. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादाचे भक्कम बळ माझ्या पाठीशी असल्याने कुणीही चिंता करू नये.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच नव्या उर्जेसह पुन्हा जनसेवेत सक्रिय होईन.
— निलेश लंके
खासदार, अहिल्यानगर
खासदार निलेश लंके पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
अहिल्यानगर : सततचे सार्वजनिक कार्यक्रम, कडाक्याच्या उन्हातील धावपळ आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे प्रकृती अस्वस्थ जाणवू लागल्याने अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांना पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून खासदार लंके यांची प्रकृती काहीशी नरम होती. खबरदारीचा उपाय म्हणून तसेच शरीरातील थकवा लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही रुटीन तपासण्या करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना खासदार लंके म्हणाले,
“रुटीन तपासण्या आणि योग्य उपचारांनंतर मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत पूर्ण क्षमतेने उपस्थित राहीन. जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कुणीही काळजी करू नये.”
उपचार आणि विश्रांतीनंतर खासदार निलेश लंके लवकरच पुन्हा अहिल्यानगरमध्ये सक्रिय होतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.



