नगर वार्ता : पारनेर मध्ये मिळतोय ३ लाखाच्या कपात चहा, तेही इतर चहाच्या किमतीत ! पहा बातमी सविस्तर.

चहा आणि प्रेम यांचं वेगळंच समीकरण आहे. एक वेळ प्रेमाला नाही म्हटलं जातं पण एक कप चहाला कोणीही नाही म्हणत नाही, त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रेमाचा चहा विकला जातो. पण हाच प्रेमाचा चहा जर एका आगळ्यावेगळ्या कपातून तुम्हाला मिळाला तर खऱ्या अर्थाने त्या चहाची गोडी देखील तितकीच छान लागू शकते. चहाचे अनेक प्रकार तुम्ही महाराष्ट्रात पाहिले असतील, ते चहा पिले असतील. अनेक ब्रँड आले असतील मात्र पारनेर मध्ये जो चहा विकला जातो त्या चहाला मात्र महाराष्ट्रात कुठेही तोड नाहीये पाहूया तर प्रेमाच्या चहाची ही चकाकणारी बातमी…
अहमदनगर म्हटलं की सगळं काही येते पहिल्यांदाच ! होता मानकरी असणारा हा जिल्हा इथे एसटी पहिली सुरू झाली, इथे रेल्वे ही पहिली सुरू झाले, इथे अनेक गोष्टी ज्या पहिल्यांदा होत असतात आता इथे चहा बाबत देखील असंच काहीतरी पहिल्यांदा होत आहे. तुम्ही अनेक प्रकारचे चहा पिला असाल मात्र अहमदनगर जिल्ह्यात जो चहा मिळतोय तो तुम्ही कधीही कुठे पिलेला नसाल. हो खरंच अहमदनगर मध्ये सोन्याच्या कपात चहा मिळतोय ऐकूनच धक्का बसला ना पण हे खर आहे.
पारनेर तालुक्यातील स्वप्निल पुजारी यांनी सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा पिण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मकरंद अनासपुरे यांचे चित्रपटासारखं नव्हे की तुला सोन्याची टोपी घालेन आणि एखादा सोन्या नावाचा मुलगा आणून त्याची टोपी देवाला चढवणे हा प्रकार नव्हे. तर चक्क साडे सहा लाख रुपये खर्च करून स्वप्निल पुजारी यांनी दोन सोन्याचे कप बनवले. आणि त्या माध्यमातून ते ग्राहकांना सोन्याच्या कपात चहा प्यायला देतात. त्यामुळे इथे येणाऱ्या ग्राहकांची सोन्याच्या कपात चहा पिण्याची इच्छा पूर्ण होते. अनेकांना वाटत असेल सोन्याच्या कपातला चहा म्हणजे हा चहा नक्कीच महाग असेल या किमतीबाबत अनेक जणांना याबद्दल कुतुहल देखील असेल मात्र असं काही नाहीये नेहमीच्या दरामध्ये या सोन्याच्या कपात देखील चहा मिळतोय.
पारनेर तालुक्यातील स्वप्निल पुजारी यांनी आपल्या प्रेमाच्या चहाच्या दुकानात सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची सुविधा पूर्ण केल्यामुळे एखादा प्रियकर आपल्या प्रियसीला मनवण्यासाठी सोन्याच्या कपातून चहा नक्कीच पाजू शकतो. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं प्रेम सोन्यासारखं मौल्यवान होऊ शकत .