शिवरायांचा एकेरी उल्लेख तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या कोशारीचे धोतर फेडणाऱ्यास 1 लाख रु बक्षीस.
राज्यपाल भगतसिंग कोसरी हे कायमच कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेचा विषय बनले आहेत. याआधीही त्यांनी कित्येक वेळेस महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलेले आहे. आणि आता पुन्हा एकदा या भगतसिंग कोषारीने सगळ्यांचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक वादग्रस्त विधान केला आहे. आणि त्यामुळे सर्वांकडून या राज्यपालाचा तीव्र निश्चित केला जात आहे.
पुण्यामध्ये तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने बॅनरबाजी करून निषेध व्यक्त केला आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, जो कोणी या राज्यपालाच धोतर फाडील किंवा फेडिल त्याला चक्क एक लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल अशी घोषणाच त्यांनी केलेली आहे. याबद्दलची माहिती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोशारी याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केला आहे आणि त्याचाच निषेध म्हणून पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळे यांनी हे बॅनर लावले आहे.
आमचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणार पण उतरत्या वयामध्ये धोतरामध्ये घाण करायची सवय या राज्यपाल कोशारीला आहे आणि त्यामुळे आम्ही या कोशारीचा जाहीर निषेध करत आहोत. या कोषारीचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असा मजकूर त्या बॅनर वरती दिसत आहे.
या दरम्यान या कोशारीच्या विधानमुळे पुन्हा एकदा नवा निर्माण झाला आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केला आहे. त्यामध्ये शिवाजी तर जुन्या काळातले आहेत असं म्हणत नव्या वादाला या कोषारीने तोंड फोडला आहे. माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी यावर संत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा असे त्यांनी यावर म्हटला आहे. कोषारी सातत्याने अशी बडबड का करतात असा प्रश्न मला कायम पडतो मी म्हणतो या कोषारीला महाराष्ट्राच्या बाहेर काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्राला नको आहे असं संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटल आहे.
” आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्हाला विचारत होते तुमचा आवडता हिरो कोण आणि त्यावेळी सुभाष चंद्र बोस, गांधी जे चांगलं वाटत असेल त्यांची नावे सांगत होतो. पण आता महाराष्ट्रात तुम्हाला नवीन हिरो मिळतील. शिवाजी तर जुने झाले आहेत, नवीन काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींनी हे शिरोळ मिळतील असं राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली आहे.