दिल्ली मेट्रोबाहेर तरुणीने केला राडा; Video पाहून लोकांची तळपायाची आग मस्तकात.
रिल्स आणि डान्स व्हिडीओ तयार करण्याचा अड्डा होत चालेली दिल्ली मेट्रो आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी दिल्ली मेट्रोमध्ये कावड यात्रेकरूंचा भगवान शंकराच्या गाण्यावर नाचताना आणि दोन तरुणींच्या अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर पोल डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
एक प्रसिद्ध बॉलीवूड गाण्यावर एक इन्फ्ल्युएन्सरचा डान्स करतानाचा व्हिडीओ चर्चेमध्ये येत आहे. हे गाणे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये खूप राग आणि रोष निर्माण होत आहे.
मुलीचे नाव सीमा कन्नोजिया असल्याचे समजते. ही तरुणी ट्रेन कोचच्या आत आणि बाहेर नाचताना दिसत आहे. कित्येक लोक तरुणीला नाचताना पाहून दूर्लक्ष करत होते तर काही लोक तरुणीला पाहून इकडे तिकडे धावत होते.
कित्येक लोक याबाबत आपली नाराजी व्यक्त करत आहे. कित्येकांनी दिल्ली मेट्रो आता एटंरटेनमेंट सेटर झाले असल्याचा दावा केला. एकाने संतापून म्हटले की, ”दिल्ली मेट्रो असे व्हिडीओ करणाऱ्यांविरोधात आता कडक कारवाई केली पाहिजे.”