शिवीगाळ दमदाटी करत, घरात घुसून महिलेचा केला विनयभंग; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पहा सविस्तर.

प्रतिनिधी : नगर
मागील कारणावरून महिलेला घरात घुसून शिवीगाळ दमदाटी केली. महिलेचा हात पिरगाळून विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध शुक्रवारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ सप्टेंबर रोजी मुकुंदनगर येथे ही घटना घडली होती. सुरुवातीला या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अकील रुस्तुम सय्यद, परवेज अकील सय्यद, रिजवान रुस्तुम सय्यद, अय्युब रुस्तुम सय्यद, हुसेन रुस्तुम सय्यद, आयान व नवेद (पुर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. जुने मुकुंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिला घरी असताना आरोपींनी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून तुमच्या मुलाने माझ्या मुलास का मारले, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.
महिलेचा हात पिरागाळून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. लाथाबुक्याने, मारहाण करुन तुम्ही गल्लीत कसे राहता, ते पाहतोच असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोना व्ही. सी. गंगावणे करीत आहेत.