कौतुकास्तव : महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेल्या तन्वी पाटीलवर कौतुकाचा वर्षाव.

ग्रामीण भागातील सर्व सामान्य कुटुंबातील महाराष्ट्राच्या महिला फुटबॉल स्पर्धेत निवड झाली. पालघर पूर्वेला असलेल्या ग्रामीण भागातील गावात तिचा जन्म झाला, शिक्षण पूर्ण झालं, सध्या गुजरात मधील अहमदाबाद येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी 27 सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे, याचं प्रतिनिधित्व तन्वी पाटील ही करत आहे.
जिद्द,मेहनत, सराव याच्या बळावर तिने हे ध्येय गाठले. तन्वी ने कॉलेजच्या जीवनात एन.सी.सी मध्ये भाग घेतला होता, दिल्ली या ठिकाणी झालेल्या थलसेना या शिबिरात प्रतिनिधित्व केला. त्यानंतर गुजरात या ठिकाणी होणारा राष्ट्रीय स्पर्धेत तिला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आहे. तन्वीचे वडील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्यात कामगार आहेत आई गृहिणी आहे.
तनवीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना तन्वी ने जिद्द आणि महत्वकांक्षाच्या जोरावरती महाराष्ट्राच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या महिला फुटबॉल संघात आपलं नाव निश्चित केलं आहे. पालघरच्या सोनपंत दांडेकर या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झालं. चार वर्षापासून त्यांनी बोईसर येथे PDTS या मैदानात फुटबॉलचा सराव करते. त्नाविला तिने केलेल्या कष्टाचा फळ मिळाले आहे.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी खेळाकडे वळून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा तन्वी व्यक्त करते. त्याकडे संधी म्हणून पाहण्याची गरज आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती यात न अडकता आपले जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ती इथपर्यंत पोहोचली. तर हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील मुला मुलींनी आता वेळ वाया न घालवता खेळ खेळून खेळच एकच संधी म्हणून त्यामध्ये आपलं करिअर करावं असा संदेश ती देते.