नेहमीप्रमाणे शेतात गवत कापायला गेला, क्षणात त्या शेतकऱ्याच होत्याच नव्हत झालं…
वयोवृद्ध शेतकरी उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शेतामध्ये गवत कापायला गेले असल्यामुळे त्यांच्या मुलाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. त्याठिकाणी त्यांचे शरीर क्षतीग्रस्त होऊन त्याचे तुकडे इकडे तिकडे पडलेले दिसले. तर शेतामध्ये वाघ फिरत असल्याचे देखील त्यांच्या मुलाला दिसले.
मृत शेतकऱ्याच्या मुलाने वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या लोकांनी घटनास्थळी पोहोचून सर्व पंचनामा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कलेक्टर सह इतर अधिकारी वर्ग सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याने त्याच्या कुटुंबाने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, गावाच्या परिसरात असलेल्या शेतामध्ये वाघाने चक्क माणसावरच हल्ला चढविल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या नाहबी गावात वाघाने वृद्ध शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. वाघाच्या या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर प्रशासनाने आता मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केली. मात्र, परिसरात वाघाची मोठी दहशत पसरली,नागपूरच्या रामटेक तालुक्यातील नाहबी गावातील शेतकरी आपल्या शेतामध्ये गवत कापायला गेला.
सायंकाळच्या वेळी लपून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर शेतकऱ्याची शिकार केली. नंदू लक्ष्मण सलया असे मृत वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.