घरातल्या नोकराच्या प्रेमात पडली, बापाला कळताच मुलीने बापासोबतच केले भयानक कांड.
प्रेम प्रकरणात भयानक प्रकार घडला , प्रेमात प्रेमी प्रेमिका यांचे मृत्यू होण अस अनेक वेळा होत मात्र या LOVE STORY मध्ये प्रेमिकाचा आणि तिच्या वडिलाच खून करण्यात आला, दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पित्याचा खून केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
सत्यभान हे ३० ऑक्टोबरपासून बेपत्ता होते, यावरून गावात विविध चर्चा सुरू होत्या. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता दोघांची चौकशी करण्यात आली. चौकशीत मुलीने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून सत्यभानचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस या संपूर्ण प्रकरणात पुरावे गोळा करत आहेत.
पश्चिम उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भयानक घटना समोर आली आहे. कलियुगातील एका तरुणीने आपल्या प्रियकरासह मिळून आपल्याच वडिलांची हत्या केली. तसेच हत्येनंतर वडिलांचा मृतदेह आधी दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ट्यूबवेलमध्ये खड्डा खोदून मृतदेह पुरला. ही धक्कादायक घटना मेरठच्या बहसूमा परिसरातील राहवती गावातील आहे.मृत सत्यभानची सावत्र मुलगी सिमरन हिचा जीव तिच्याच घरातील नोकर आशिषवर जडला होता.
त्यानंतर आशिष आणि सिमरनची प्रेमकहाणीबद्दल वडिलांना समजताच ते संतापले. वडिल सत्यभान यांनी सावत्र मुलगी सिमरनला मारहाण केली. या मारहाणीमुळे सिमरन भडकली आणि तिने वडिलांच्या खुनाचा कट रचला.त्यानंतर रात्री आशिष आणि सिमरनने वडिलांचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह पेंढ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. मात्र, दोन दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्याने ट्रॅक्टरवर लोड केल्यानंतर मृतदेह ट्यूबवेलमध्ये पुरण्यात आला. मात्र, हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांना समजल्यावर खळबळ उडाली.