नाश्ता करताना ” तू माझ्या दाढीला हात का लावला ?” म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासोबत पाहा काय केले.
अगदी किरकोळ कारणातून त्या दोन मित्रांमध्ये वाद झाला,त्यातून खून ही झाला, सध्या गुन्हेगारी एवढी वाढली आहे की किरकोळ गोस्ठीमुळे खून करणे अश्या गोष्टी घडत आहेत, हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले होते. यादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
औरंगाबाद येथील पैठण तालुक्यातील पिंपळवाडीतील अब्दुल उर्फ सांडू काम्मा शेख आणि रामेर उर्फ राम गजेसिंग बोत हे दोघेही मित्र आहेत. ते पैठण औरंगाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी गेले. मात्र याचवेळी राम बोत याच्या दाढीला मयत सांडू शेख याने हात लावला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
माझ्या दाढीला हात का लावला? यावरून दोन्ही मित्रांमध्ये वाद झाला. त्यातून हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पाठीत दोन वार करून ही हत्या करण्यात आली ,दोन्ही मित्रांमधील वाद एवढ्या विकोपाला गेला की राम याने बाजूला असलेल्या अंडा आमलेटच्या दुकानातील चाकूने सांडू यांच्या पाठीमागे दोन वार केले.
सांडू हा गंभीर जखमी झाल्याने दवाखान्यात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काही तासांच्या आत आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.