मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला प्रचंड संख्येने उपस्थित रहा – उपनगराध्यक्ष अब्दुल समीर शिवसेना पदाधिकारी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव ( प्रतिनिधी ) दि.30, मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास सोयगाव तालुक्यातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ.सत्तार यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातून 25 हजार पदाधिकारी कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असून यासाठी 500 बसेसचे नियोजन मित्र मंडळाने केले असून महिला पुरुषांना स्वतंत्र बस असणार असल्याचे अब्दुल समीर म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने सोयगाव शहरासह तालुक्यातील सवाळतबारा, फर्दापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी सिल्लोड – सोयगाव तालुक्यासाठी भरभरून निधी दिला. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या रूपाने मराठवाड्याला पहिल्यांदा कृषी सारखे महत्वाचे खाते दिले. स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम राज्यात होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना खंबीरपणे समर्थन देण्यासाठी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, सोयगाव न. प. नगराध्यक्ष आशबी तडवी, संतोष बोडखे, भगवान जोहरे, सौ. संध्या मापारी, अशोक खेडेकर, लतीफ शहा,पप्पू राऊत, नगरसेवक बबलू पठाण, स्वप्नील शेळके,शिवाप्पा चोपडे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, सुरेश चव्हाण,सांडू तडवी,राधेश्याम जाधव,रमेश गव्हाडे,बाबू चव्हाण,सलीम पठाण, उस्मान पठाण, विलास वराडे, शेख रउफ, रवींद्र बावस्कर,रशीद पठाण,शेख उमर,शेख शपीक भरत राठोड, डॉ.जहांगीर देशमुख, भगवान वारंगणे, शिवदास राजपूत, मोतीराम पंडीत, पंजाब कुंगर,संजय आगे, वसंत राठोड, सांडू राठोड, समाधान तायडे,सुधाकर चौधरी, अरविंद राठोड,राजू कुडके, अमोल मापारी, हर्षल देशमुख,दत्तू इंगळे,सौ.जुबेदाबी तडवी,सौ. सुरेखा तायडे आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.