अंधत्व येऊन खचला नाही, जिद्दीने अभ्यास करून आज मायक्रोसॉफ्ट मधून तब्बल एवढा लाखांचे पॅकेज.
आपण जर डोळे बंद केले तर आपल्यासमोर काय दिसतं फक्त अंधार आणि अंधारच …थोडा वेळ लाईट जरी गेली, तरी आपल्याला काही सुचत नाही. आपण पहिल्यांदा आपल्या घरात किंवा आपल्या अवतीभवती उजेड कसा निर्माण होईल यासाठी तडजोड करत असतो, मात्र डोळ्यासमोर कायमस्वरूपी अंधारच आला तर ? काय करावं? हा विचार करणंच अशक्य !
वयाच्या अकराव्या वर्षी आजारपणामुळे सौरभ प्रसादने आपले डोळे गमावले आणि प्रवास सुरू झाला तो आपल्या आतल्या दृष्टी सोबत, सौरभने आपला आंधळेपण आपली कधी कमजोरी बनू दिली नाही, त्याने जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यास करून यश मिळवले, मेहनतीच्या जोरावरती सौरभ मायक्रोसॉफ्ट कंपनी मध्ये 51 लाख रुपयांचं पॅकेज मिळवणाऱ्या सौरभ प्रसाद याची ही यशस्वी कहाणी…
झारखंडच्या सौरभ प्रसाद यांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवले. लहानपणापासून सौरभला वाचन लेखन यात जास्त रुची होती, परंतु अकराव्या वर्षी काचबिंदू नावाच्या आजाराने त्याला ग्रासले आणि त्याचं स्वप्न भंगलं. तो तिसरी वर्गात शिकत असतानाच पूर्णपणे दृष्टी गेली मात्र सौरभला खचून न जाता आपला अभ्यास सुरूच ठेवला. जिद्दीच्या बळावर ती सौरभ या परिस्थितीशी लढा देऊन ब्रेल लिपीमध्ये अभ्यास करण्याचा संकल्प केला. यावर आपल्या मुलाचे कौतुक करताना वडील म्हणाले ” मुलांची शिक्षणाची इच्छा होती त्याला पूर्ण पाठिंबा दिला स्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला.
आठवी ते दहावीपर्यंतची पुस्तके ब्रेल लिपीत छापले जात नसल्याची बाब समोर आली. अशा स्थितीत वडिलांनी आता माझी सगळी मेहनत वाया गेल्याची भावना व्यक्त केली, अनेक विनंत्या करून सरकारला सहकार्य मिळत नसलं नव्हतं. सौरभसाठी आठवी दहावीपर्यंतची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली .आणि त्यानंतर सौरभ न आयबीएस देहरादून शाळेत प्रवेश घेतला त्या ठिकाणी तरी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 97 टक्के इतके मार्क मिळवले आणि तो पहिला आला. त्यानंतर 93% ने बारावी देखील उत्तीर्ण केली. आणि IT दिल्लीत प्रवेश मिळवला, त्याठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकला. सौरभचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतो. यशस्वी स्वप्न पाहणारा आणि ती सत्यात उतरवणारा सौरभ प्रसाद हा प्रत्येकासाठी आदर्शवत असाच आहे.