Breaking News : सोयगाव ( नायगाव ) शिवारातील शेत वस्तीवर जबरी चोरी; तपासासाठी पोलिसांची दोन पथके.
सोयगाव दि.१४.. सोयगाव तालुक्यातील नायगाव येथे नायगाव शिवारात असलेल्या शेतवस्तीवर ता.१३ मध्यरात्री ०१.३० ते ०१.४५ च्या सुमारास दिलीप बोरसे यांच्या शेतातील गट नं. 19-20 मध्ये असलेल्या कालू महारिया सेनानी शेतमजुराच्या राहत्या घरात अनोळखी चार इसमांनी संगणमत करून घरात अनाधिकारने प्रवेश केला.
व कालू महारिया व त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या कुटूंबियांना धमकावत त्यांच्या जवळ असलेली रोख रक्कम १ लाख रुपये,८८२५० रुपयांचे २.६४३ कि.ग्राम चे चांदीचे बाजूबंद,गळ्यातील कडे,कंबरपट्टा, व दहाहजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण १,९८२५० रुपयांची सदरील अनोळखी इसमांनी हिसकावून व जीवेमारण्याची धमकी देऊन जबरी चोरी केली याबाबत सोयगाव पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी चोरी तपासकामी पोलिसांचे दोन पथक स्थापन केले असून ता.१४ सोमवार औरंगाबाद येथून चोरांचा सुगावा काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले होते.
दरम्यान टिप्पू नावाच्या श्वानाने ५०० मीटर पर्यत माग काढला असून लवकरात लवकर चोरी उकल करण्याचा प्रयत्न असल्याचे स.पो.नि. अनमोल केदार यांनी सांगितले आहे या चोरीच्या घटनेचा तपास औरंगाबाद पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. अनमोल केदार, पोलिस उप निरीक्षक गीते, यांच्यासह पो. ना./११७७ राजू बर्डे, विकास दुबिले,श्रीकांत तलेगावे,राजू बर्डे, यांच्यासह इतर करत आहेत