Breaking : आदिवासी विद्यार्थ्यांला मारहाण करणे आले अंगउलट, अकोट बस स्थानकातील ‘ते’ दोन कर्मचारी झाले निलंबित.
शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी घेतली होती आक्रमक भूमिका.
दर्यापूर(ता.प्रतिनिधी)-तालुक्यातील वडनेर गंगाई येथील आदिवासी विद्यार्थी येवदा येथे शिक्षण घेण्यासाठी अकोट बस स्थानकातील बसने जात असताना,विद्यार्थ्यांने 500 रु ची नोट दिली त्यामुळे महिला वाहक जवळ सुट्टे पैसे नसल्याने त्या विद्यार्थ्यांला येवदा येथे उतरून न देता दर्यापूर येथील बस स्थानक येथे बस मध्ये नेले व तेथे या विद्यार्थ्यांसोबत वाद घालत त्याला अमानुष मारहाण करणाऱ्या अकोट एसटी आगारातील चालक व वाहक यांना तात्काळ निलंबित करा.
अशा मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय अधिकाऱ्यांना दिले व जेव्हा पर्यत निलंबित होत नाही, तो पर्यत कार्यालयातून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा गोपाल पाटील अरबट यांनी घेतला होता. यावर पुढील कारवाई करत त्या दोन दोषी कर्मचाऱ्यांना अखेर तात्काळ निलंबित करण्यात आले.
सदर घटना अशी की,अकोट आगाराची बस क्रमांक एम.एच.30-9643 यामधील चालक व वाहक यांनी शालेय विद्यार्थी वीरेंद्र देवेंद्र पवार या आदिवासी मुलाला सुटे पैसे नसल्यामुळे श्री विशाल इंगळे व रूपाली वनकर या दोघांनी मिळून दर्यापूर बस स्थानकात बेदम मारहाण केली होती.
या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ आजच्या आज निलंबित करण्यात यावे,अन्यथा दर्यापूर आगारात अकोट डेपोची एकही बस येऊ देणार नाही. शालेय विद्यार्थ्याला न्याय देण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी केली होती. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील केने, तालुका संघटक अतुल पाटील सगन,विनय गावंडे उपस्थित होते.