भर कार्यक्रमात BJP नेत्यांमध्ये हाणामारी; स्टेजवरच लावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल.
गल्लीमध्ये होणारे नळावरचे वाद अनेकदा पहिले असतील, ट्रेन मध्ये नळावरून होणारे वाद हि पाहिले असतील .महिला कधी कुठे वाद सुरु करतात, असाच एक वादाचा किस्सा भर स्टेजवर घडला आहे, दोन महिला कार्यकर्ता स्टेजवरच वाद करत होत्या,मध्यप्रदेशमधील पन्ना या येथे हा कार्यक्रम सुरु होता.मोदी सरकारनं स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती. आपला परिसर स्वच्छ राहावा, प्रदुषण कमी व्हावं, रोगराई पसरू नये म्हणून केंद्र सरकार काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं स्वच्छतेबाबत जनजागृती करत आहे. असाच एक कार्यक्रम मध्यप्रदेशमधील पन्ना या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पण आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमात चक्क भाजपाच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.
लक्षवेधी बाब म्हणजे कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे माईकवर भाषण करत असताना पाठीमागे स्टेजवर या महिलांची हाणामारी सुरू होती. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अन् देशभरातील नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.तर त्याचं झालं असं की पन्ना या ठिकाणी राष्ट्रीय व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रादेशिक खासदार व्हीडी शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते विजयी खेळाडूना पुरस्कारही देण्यात आले. शिवाय शिवराज सरकारचे कृषी मंत्री कमल पटेल, कामगार मंत्री ब्रिजेंद्र सिंह आणि स्थानिक आमदार संजय पाठक देखील उपस्थित होते. शिवाय शेकडो प्रेक्षक हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. अशा नामांकित कार्यक्रात भाजपा महिला कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
प्रमुख पाहुणे आपल्या भाषणातून स्वच्छ भारत अभियानाचं महत्व सांगत होते. पण नेत्याचं स्टेजवर भाषण सुरू असताना पाठीमागे एक महिला कार्यकर्ता उठली अन् ती दुसऱ्या महिलेसोबत भांडण करू लागली. पाहता पाहता हे भांडण इतकं वाढलं की एकीने दुसरीच्या कानशिलात लगावली. अन् मग काय स्टेजवर एकच हाणामारी सुरू झाली. या दोन महिला नेत्यांमध्ये मारामारी सुरू होताच भाजपचे सर्व प्रमुख नेते व्यासपीठावरून निघून गेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. शिवाय विरोधक नेते या प्रकरणावरून आता भाजपाला ट्रोल करत आहेत.