कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी बेकायदेशीर सावकाराच्या विरोधात वणी पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल.
पिडिताची गुन्हा दाखल करण्याची मागणी.
हात उसनवार घेतलेले पैसे अव्वाच्या सव्वा व्याजदर लावत परत करण्याची धमकी देत. व्याजासह पैसे परत नाही केल्यास मारहाण करण्याची कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या कोल्हेर येथील खासगी सावकार गणेश ऊर्फ बाळू गवळी याच्या विरोधात पीडित संदीप भिकाजी अवधुत यांनी आज रोजी वणी पोलिसांत ऑनलाईन तक्रार दाखल करत न्याय देण्याची व कुटुंबाला संरक्षण पुरविण्याची मागणी केली.
कोल्हेर येथे राहणारा बेकायदेशीर खासगी सावकार गणेश उर्फ बाळू गवळी याचा पिक – अप व्यवसाय आहे.वणी येथील राहणार पिक-अप खरेदी विक्रेता एजंट संदीप शिंदे मार्फत ओळख झाली.त्यातून हात उसने घेतलेले पैसे यांना अव्वा च्या सव्वा व्याज लावत संदीप शिंदे यांच्या मार्फत नेहमी तगादा लावला व मागितलेली रक्कम मला देणे अशक्य नसल्याने त्याने पोलिसांत तक्रार करण्याची व कुटुंबाला व तक्रारदाराला जिवे मारण्याची धमकी दिली
आज रोजी बेकायदेशीर व्यवसाय करणारा खाजगी सावकार गणेश ऊर्फ बाळू गवळी व त्याचे साथीदार जे ह्या व्यवसायात त्याला अर्थ सहाय्य करतात त्यांच्या विरोधात वणी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या प्रकाराने ग्रामीण भागात ही खासगी सावकारीने डोके वर काढल्याचे दिसत असून यातून सर्व सामान्य गरजू लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने बघावे व दोषींवर कडक कारवाई करावी असे आवाहन अखिल भारतीय सक्षम मिडीया फाउंडेशन महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा वंचित आघाडीचे चे उत्तर महाराष्ट्र सचिव संजयजी दोंदे यांनी प्रसार माध्यमांनशी बोलताना सांगितले.आता या प्रकरणात वणी पोलिस व तालुका व जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालय काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.सदरील तक्रारीची प्रत विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक उपनिबंधक यांना देण्यात आलेली आहे.