परिस्थिती पाहुन लग्न करू नका; स्थिती पाहुन करा – हभप अशोक रेपाळे.
टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी
समाजातील विवाह व्यवस्था एका वेगळ्या पद्धतिने सुरु आहे. मुला मुलिंची लग्न जमविताना परिस्थिति पाहुन लग्न जुळवु नका त्या कुटुंबाची धार्मिक आध्यात्मिक स्थिति कशी आहे हे पहा तरच वैवाहिक जीवन आनंद मय होईल अन्यथा अन्यथा दोन्ही कुटुंबाला हयात भर मानसिक त्रास सहन करावाच लागेल असे प्रतिपादन हभप अशोक महाराज रेपाळे ( आळंदी ) यानी केले.
पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार – पारनेर रोडवरील गणपती चौफुला येथील गणपती मंदिरात अयोजीत केलेल्या ३३ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे किर्तन मालेतील तिसरे पुष्प गुंफताना ते बोलते होते. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
हभप रेपाळे पुढे बोलताना म्हणाले की आजची वैवाहिक संस्थेची परिस्थिति पाहता फारच विदारक चित्र पाहवायला मिळते.
जुन्या काळातील विवाह आताच्या काळात का बदलली याचे ही विचार करण्याची गरज आहे विवाह जुळवताना मुलि कडील मंडळी मुलाची आर्थिक परिस्थितिच पाहतात मात्र त्या पेक्षा मुलामुलिकडील मंडळीनी त्यांची स्थिती काय आहे सामाजिक धार्मिक आधात्मिक परिस्थिति पाहणे अवश्यक आहे.
त्यामुळे दोन्ही कुटुंबाचा ऋणानुंबंध घनिष्ठ झाल्या शिवाय राहणार नाही . युवकांनी समाजात जीवन जगताना सामाजिक प्रतिष्ठा जपा आणि आयुष्याच सोन करा जीवनाचा आनंद घ्या परमेश्वर भक्ति मध्ये तल्लीन व्हा असा प्रेमळ सल्लाही हभप रेपाळे यांनी दिला.