दोन महिला वकिलांत कोर्टातच झाली ढू-शूम-ढू-शूम, व्हिडिओ पाहिल्यावर हसू आवरणार नाही.

ज्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळतो ते ठिकाण म्हणजे कोर्ट आपल्यासोबत अन्याय झाला किंवा आपल्याला जर न्याय मागायचा असेल तर आपण कोर्टाचे दरवाजे ठोठावतो. वाद कोणतीही असो छोटे मोठे व इतर कोणतेही आपण हे वाद मिटवायचे झाले तर अंतिम टप्पा हा कोर्टाचा असतो. या ठिकाणी आपण आपले वकील ठरवून आपापल्या परीने आपली बाजू मांडून आरोप प्रत्यारोप वगैरे करत असतो. तसेच जर पाहायला गेलं तर कोर्ट म्हटलं की तिथं वादावादी ही आली, दोन पक्षाचे वकील आपापली बाजू मांडत असतात आणि एकमेकांचे बाजूने समोर असणाऱ्यांवर आरोप प्रत्यारोप हे करत असतो. कोणताही वाद मिटवण्यासाठी न्याय देण्यासाठी किंवा कायद्यासाठी कोर्ट असतं पण सध्या या कोर्टा मधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे.
आपण आपली केस कोर्टात उभी करण्यासाठी वकील निवडतो आणि वकिलांमार्फत कोर्टात केस चालवली जाते. पण चक्क एका कोर्टामध्ये दोन महिला वकील आपापसात भिडल्या आहेत. काही कारणावरून या दोघींमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला आणि या वादामध्ये एकमेकींना दे दनादन सुरू झाली. सार्वजनिक नळावर किंवा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ज्याप्रकारे भांडण होतात तशाच प्रकारे या काळ्या कोटातल्या वकील एकमेकींशी भांडू लागल्या आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसायला आल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की, दोन्ही महिला वकील वकिलाच्या ड्रेस मध्ये असताना एकमेकींच्या झिंज्या धरून एकमेकींना सटासट लागवत आहेत यामध्ये या दोघींनी एकमेकींना लाथा बुक्क्यांनीही मारहाण केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी असलेले इतर वकील व काही लोक त्यांच्यामध्ये पडून ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात पण या दोन्हीही कुणाचं न ऐकता मागे हटायला तयार नसतात. जर कोणी मध्यस्थी केली तर थोडा वेळ शांत बसतात पण लगेच एकमेकींवर धावून जातात पुरुष वकिलांना या महिला आवरणात असं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते.
सदरची घटना ही उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्हा न्यायालयातील असल्यास सांगण्यात येत आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या फॅमिली कोर्ट बाहेरच हा सगळा प्रकार घडलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिला वकील आपापल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या. त्यावेळी काही कारणावरून या दोन्हींमध्ये वाद झाला आणि या वादाचे स्वरूप नंतर हाणामारी पर्यंत पोहोचला. त्या ठिकाणी असलेल्या वकिलांनी या मारहाणीचं दृश्य आपापल्या कॅमेरा मध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.