विदयुत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गरीब घरातील कर्तबगार मुलगा विजेचा शॉक लागून मृत्यू पावला.
शिर्डी प्रतिनिधी,
कोपरगाव येथील गरीब कुटुंब असलेले संजय पोटे यांचा मुलगा चि. अभय संजय पोटे हा घरातील कर्तबगार मुलगा नुकताच शिर्डी येथे रेफ्रिजरेशन व एयरकंडीशनिंगचे काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू पावला. त्यामुळे संपूर्ण कोपरगाव शहरावर दुःखाची शोककळा पसरली आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की, संजय ऊर्फ संजुपाटील बाबुराव पोटे वय – 54 वर्ष धंदा – मजुरी रा. निवारा हौसिंग सोसायटी काका कोयटे यांच्या बंगल्याच्या मागे, कोपरगाव या ठिकाणी पत्नी सौ. सरला संजय ऊर्फ संजुपाटील पोटे, वय- 48 वर्षे धंदा-काही नाही व मुले 1) चि. अभय संजय ऊर्फ संजुपाटील पोटे वय- 21 वर्षे धंदा- ए सी टेक्निशियन 2) चि. प्रतिक संजय ऊर्फ संजुपाटील पोटे वय 23 वर्षे धंदा मजुरी यांचेसह एकत्र कुटुंबात राहतात.
धाकटा मुलगा अभय हा तुषार जयप्रकाश होडे व सुरज जयप्रकाश होडे रा.कोपरगाव यांच्या होडे रेफ्रिजरेशन व एयरकंडिशनिंग नावाच्या दुकानात ए. सी. टेक्नीशियन म्हणुन गेल्या 1 वर्षापासुन काम करीत होता. व त्या कामातुन तो महिन्याकाठी 15 ते 20 हजार रुपये कमवीत होता. आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. मुलगा अभय याचा रेफ्रिजीरेशन अॅण्ड अयर कंडीशनरचा आय.टी.आय. चा कोर्स झालेला होता. आई वडील सतत आजारी असल्याने मुलगा अभय हाच घरातील कमवता व कर्ता होता.
दि. 11/05/2024 रोजी मुलगा अभय हा त्याचा मालक तुषार होडे व सुरज होडे यांच्या सांगण्यानुसार शिर्डी येथे काम करण्यासाठी गेला असता होडे यांनी फोन करून घरच्यांना माहिती दिली. तुम्ही लगेच श्री. साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये या. मी स्वतः व माझा मित्र सोनु उगले त्वरीत कोपरगांव वरुन निघून शिर्डी येथे श्री. साईबाबा हॉस्पिटलमध्ये तातडीने गेलो. त्यावेळी मला समजले की, उच्च विदयुत दाबाच्या विदयुत वाहिनीचा धक्का लागून मुलगा हा मृत झालेला होता. त्यानंतर माझ्या मुलाचे मृत शरीरावर ग्रामीण रुग्णालय राहाता येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे प्रेत संध्याकाळी आमच्या ताब्यात मिळाले आणि त्याचेवर कोपरगांव येथे दि. 11/05/2024 रोजी रात्री साधारणताः 10:00 वाजता शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
दि. 11/05/2024 रोजी माझा मुलगा अभय संजय ऊर्फ संजुपाटील पोटे हा श्री तुषार होडे व सुरज होडे यांच्याकडे कामाला असतांना आणि त्यांचे सुचनेनुसार हॉटेल कलासाई कॉम्लेक्स शिर्डी येथे ए.सी बसविण्याचे काम करीत असतांना विदयुत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे माझा मुलगा अभय पोटे यास इमारतीजवळुन जाणाऱ्या उच्च दाबाच्या विदयुत वाहिनीतुन वीजेचा धक्का बसला आणि तो मृत झाला म्हणुन विदयुत वितरण कंपनी आणि संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे माझा मुलगा अभय पोटे याचा मृत्यु झाला म्हणुन त्यांचेविरुध्द अभयचे वडील यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.