जावईचे लाड सगळेच करतात, पण सासरवाडीत लाडाच्या जावयाने पाहा काय केला पराक्रम !
सासरवाडीचा जावई हा नेहमी लाडका असतो, आपल्या मुलीला सुखात सांभाळाव म्हणून अनेक जावयाचे अनेक लाड पुरवले जातात , मात्र नाशिकचा एक जावई भामटा चोर निघाला.
मीरा शशिकांत गंभिरे (वय ५०) ह्या नाशिकच्या गंगापूर रोड वरील ध्रुवनगर येथे वास्तव्यास आहेत. गंगापूर परिसरात त्यांचे ब्युटी पार्लर आहे. त्यांच्या मुलीचे अलोकवर अतोनात प्रेम होते म्हणून आईने थाटामाटात या दोघाचाही प्रेमविवाह करून दिला.
मात्र अलोक बेरोजगार असल्याने नेहमी सासूच्या घरी बहुतांशी मुक्कामी असायचा. यामुळे त्याला घरात कुठे काय आहे याची संपूर्ण माहिती होती. कपाटात साडे दहा लाखाचे दागिने असल्याची माहिती त्याला मिळाली होती. हे दागिने चोरण्याची तयारी त्याने मनात केली. त्याने सासूच्या नकळत कपाटाची डूप्लीकेट चाबी सुद्धा तयार करून घेतली होती. सासू शनिवारी ब्युटी पार्लरला गेली असताना जावई अलोक हा सासूच्या घरी गेला. शेजारील कुटुंब त्याला ओळखत असल्याने त्याने चेहऱ्याला मास्क लावला. चोरट्याने चोरी केली असावी असे वाटावे म्हणून तशीच वेषभूषा करून चोरी केली.
जावई चोर निघाल्यामुळे मीराबाईंची आता पंचाईत झाली आहे. लाडक्या मुलीचं मन मोडायचं नाही म्हणून पुढचा मागचा विचार न करता आलोक शी लग्न लावून दिलं. मात्र जावयाने केलेला प्रकारामुळे आता कपाळाला हात मारायची वेळ आली आहे.
नाशिक शहरात भरदिवसा घरात चोरीची घटना घडली होती. याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या घटनेचा तपास करत असताना जावयानेच चोरी केल्याच पोलीस तपासात उघड झाल असून संशयित जावई अलोक दत्तात्रय सानपला पोलिसांनी अटक केली आहे.