हृदयद्रावक : ” मी साधी भोळी, गावाकडे शिकलेली मला …..” असे चिठ्ठीत लिहून तिने उचलले टोकाचे पाऊल.
रागिंग या प्रकारांना आळा बसावा यासाठी महाविद्यालयांमध्ये शाळेमध्ये अनेक उपक्रम केले जातात. या रागिंग मुळे विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होतं आणि विद्यार्थी एकदा अभ्यासात कमी पडतात किंवा ते एखादं चुकीचं पाऊल उचलतात. त्यांचा स्वभाव हा संकुचित होतो मात्र तरीदेखील स्वतःचे काही ग्रह करून विद्यार्थी चुकीचं पाऊल उचलत असतील तर ? कारण हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका विद्यार्थिनीनं आपल्या खोलीत आत्महत्या केलीय एक धक्कादायक बातमी समोर एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केली या देवगिरी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्याकडे सुसाइड नोट सापडली त्यामध्ये तिने काही माहिती लिहिली आहे. ही विद्यार्थिनी आरती सर्जेराव कोल्हे वय वर्षे एकोणीस तालुका घनसांगवी गूरूपिंपरी या ठिकाणची रहिवासी होती.
” मी खूप साधी आहे बारावीपर्यंत खेड्या गावात शिकले मला शहरी वातावरणाची सवय नाहीये शहराशी जुळवून घेताना कुचंबणा होते ” असं तिने चिठ्ठीत नमूद केले. आरती पुढे चिठ्ठीत म्हणतीये “माझं स्वप्न टाटा बिर्ला सारखं होण्याचा आहे माझ्या मैत्रिणी चांगले आहेत पण बीकॉम तीन वर्षाचा आहे ते झेपेल की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे” असे या चिठ्ठीत मध्ये तिने लिहिले आणि याचं संकुचित विचारातून तीन हे टोकाचं पाऊल उचललं.
पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत आपली परिस्थिती काय आहे आपली पार्श्वभूमी काय आहे हे आपल्या शिक्षणासाठी ही आपल्या करिअरसाठी इतकं महत्त्वाचं असतं. आपण अभ्यास काय करतोय आपण कशा पद्धतीने यशस्वी होते हे फार महत्त्वाचं असतं मात्र आरतीला हे लक्षात आलं असेल आणि आरतीने नैराश्यातून हे चुकीचं पाऊल उचलले असणार आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपासणी करत आहेत. यात आणखी काय माहिती मिळते याकडे आता पोलिसांसह सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.