कृष्णाली फाउंडेशनकडून जिल्हा परिषद कर्जुनेखारे वर्ग १ ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान.

तसेच शाळेत मोफत शालेय साहित्य वाटप आणि गुणवंतांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न.
नगर प्रतिनिधी,
जर आपण समाजात जन्माला आलो तर आपल्याला समाजाला काहीतरी परत द्यावे लागेल. पत्रकारिता करत असताना गावापासून शहरापर्यंत, जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत प्रवास केला आणि त्यावेळी अनेक गोष्टींच्या कमतरता जाणवल्या, उदाहरणार्थ, समाजातील काही घटक आहेत ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण यामध्ये काही त्रुटी आढळल्या आणि तेव्हा या घटकांवर काम करण्याची गरज भासू लागली. आणि म्हणून या घटकांमध्ये पुढे येऊन मदत करण्याची इच्छा निर्माण झाली. पण हे काम करण्यासाठी एखाद माध्यम म्हणून, आम्ही, काही मित्र आणि कुटुंबातील सदस्य यांनी एकत्र येऊन कृष्णाली फाउंडेशनची स्थापना / सुरुवात केली.

जिल्हा परिषदेत शाळेचा माणूस असावा सर्वसामान्यांची लेक या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांना मदत व्हावी या सेवाभावातून कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी एक अनोखा उपक्रम या शाळेमध्ये राबवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जुनेखारे मध्ये ज्यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश पहिली मध्ये घेतला अशा पालकांचा सन्मान यावेळी करण्यात आला तर पहिलीच्या विद्यार्थ्यांना ” स्कूल बॅग, वह्या- पेन – पेन्सिल किट ” हे देऊन त्यांचं जंगी स्वागत केला तसेच इतर वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले व त्याच प्रमाणे गोष्टीची पुस्तके, महापुरुषांचे चरित्र पुस्तके देखील देण्यात आले.

दीप प्रज्वलन व सरस्वती पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेतील मुलींनी आलेल्या पाहुण्यांसाठी स्वागत गीत गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सचिव प्रियंका पाटील शेळके यांनी केलं. शाळेतील एका विद्यार्थिनीने खासदार निलेश लंके आणि राणीताई लंके यांचे स्केच काढून स्वतः सप्रेम भेट दिली, धडक कारवाईच्या कामामुळे डीवायएसपी संतोष खाडे यांना उपस्थित राहता आलं नाही, फोन द्वारे त्यांनी मुलांशी हितगुज केले.

या कार्यक्रमासाठी मा. जिल्हा परिषद सदस्य राणी निलेश लंके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर युवा शास्त्रज्ञ डॉक्टर रणजीत राऊत , सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा मेट्रन सौ.छाया निमसे, आपला मावळा अध्यक्ष रामेश्वर निमसे, उद्योजक संग्राम आंधळे, शिवाजी उबाळे, गावचे मा.उपसरपंच अंकुश शेळके, विद्यमान उपसरपंच रामेश्वर निमसे, नवनाथ शिंदे सर, गणेश तोरडमल, मेजर भागवत शेळके, भारत बोबडे, स्वप्नील निमसे, गणेश मोरे, अमर बोबडे, कैलास लांडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गेल्या 30 वर्षी पासून अविरत पणे रुग्णसेवा देणाऱ्या, गावातील अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या छायाताई निमसे यांचे कृष्णाली फाऊंडेशन कडून सन्मान करुन त्यांना पुरस्कार देण्यात आला. युवा शास्त्रज्ञ रणजीत राऊत यांचा देखील वटवृक्ष देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात ट्रॉफी देऊन करण्यात आला, कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी आपण गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली, राणीताई लंके यांनी कृष्णाली फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.

कार्यक्रमात बोलताना उपसरपंच अंकुश शेळके पाटील, आपला मावळा’चे अध्यक्ष रामेश्वर निमसे व छाया ताई निमसे यांनी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले, व यापुढेही आपण मुलांच्या पुढील भवितव्यासाठी नेहमी तत्पर राहून भरीव असं काम करण्याचं आश्वासन दिलं. या कार्यक्रमात कृष्णाली फाउंडेशनच्या या उपक्रमात हातभार लावणारे, मा श्री सागर गांधी उदयोजक ( श्री टाईल्स ), उद्योजक संग्राम आंधळे, अहिल्यानगर पोलीस प्रशासन व इतरांचे अध्यक्षांकडून आभार मानण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव kp यांनी केले तर आभार कैलास लांडे यांनी व्यक्त केले.