डेटिंग अॅपवर ओळख झाली, नंबर एक्स्चेंज करुन चॅट सुरु केले. तरुणी – तरुण हॉटेलवर दोघं भेटले अन्…
डेटिंग साईटवरून दोघांची ओळख झाली. दोघांनी नंबर एक्स्चेंज करुन चॅट सुरु केले. मैत्रीनंतर विश्वास प्राप्त करुन तरुणीने भेटण्यासाठी तरुणाला रुम बूक करायला सांगितली.
ऑनलाइन डेटिंग ॲपच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावले जात असल्याचं वारंवार समोर येत आहे. पुणे शहरात ऑनलाईन डेटिंग ॲपमुळे होणाऱ्या फसगतींच्या घटना बऱ्याच वेळा समोर येत आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणाला लुटल्याचा प्रकार पुण्यातल्या खराडी येथील एका हॉटेलमध्ये घडला आहे. या प्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहे.
अधिक माहिती अशी आहे की, सीकींग अॅडव्हेंचर या डेटिंग साईटवरून दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी नंबर एक्स्चेंज करुन टेलिग्रामवर चॅट सुरु केले. मैत्रीनंतर विश्वास प्राप्त करुन आरोपी तरुणीने भेटण्यासाठी तरुणाला रुम बूक करायला सांगितली.
तिथे रुमवर भेटण्यासाठी गेले असता भलताच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीचा मोबाईल जप्त केला आणि ऑनलाईन २०,००० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.
याबाबत कोणाला काही सांगितलं, तर बलात्कारची केस दाखल करेन, अशी धमकीही दिल्याचा दावा तरुणाने केला आहे. याबाबत फिर्यादी तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे.