दोनदा भेटली, कंपनी आवडली; विश्वासानं तिसऱ्यांदा भेटली, पण त्यानं गैरफायदा घेतला, अन्…
एका प्रेम प्रकरणाचा काळा चेहरा समोर आला ओळख झाली प्रेम झालं आणि त्यानंतर घात झाला सदिच्छा सदिच्छाचा खून तिच्याच प्रियकरांना केला खून करून त्यांना पुरावे देखील नष्ट केलेत बेपत्ता झाल्याच्या दिवशी म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२१ रोजी जेव्हा २२ वर्षीय सदिच्छा साने तिसऱ्यांदा मिथूला भेटली होती, तेव्हा तिने त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला असावा, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी गप्पा मारत बसण्यात तिला काहीच वावगं वाटलं नसावं, असा संशय गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे. मात्र मिथूने परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असावा, त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली असावा. त्यामुळे लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न हेच तिला ठार मारण्याचे प्रथमदर्शनी कारण असल्याचं क्राईम ब्रँचने म्हटलं आहे.
पालघर येथे राहणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणात जवळपास सव्वा वर्षानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पोलिसांनी लाईफगार्ड मिथू सिंग आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. मात्र ऑक्टोबर २०२१ मध्ये सदिच्छा दोन वेळा मिथूला भेटली होती, असा दावा केला जात आहे. बेपत्ता झाल्याच्या एक महिना अगोदर बँड स्टँड येथील मिथूज् किचनमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. जेवताना दोघांमध्ये अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या.मिथू सिंग आणि त्याचा मित्र अब्दुल जब्बार अन्सारी यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हे शाखेने आतापर्यंत कलम ३०२ (हत्या), २०१ (पुरावा नष्ट करणे) लागू केली आहेत.
आता सदिच्याच्या हत्येमागील हेतूचा तपास पोलीस करत आहेत. सरकारी वकील एम. एस. चौधरी यांनी न्यायालयासमोर एक गोपनीय डायरी सादर करत आणि आरोपींची पाच दिवसांची कोठडी मागितली.दक्षिण मुंबई येथील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी परीक्षेसाठी घरातून निघाली, ती परतलीच नाही.
कुटुंबीयांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. जे. जे. मार्ग पोलिसांनी देखील तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. सदिच्छाला शेवटचे जीवरक्षक मिथू सिंगने पाहिले होते.पोलिसात तक्रार देखील दाखल केली मात्र तिचा ठाव ठिकाणा लागला नाही सदिच्छाला मृत्यूच्या दारात नेणारा तिचाच प्रियकर याला पोलिसांनी आता अटक केली