शहरात मध्ये खुनी थरार ; भर दिवसा एकाच्या पोटात खुपसला चाकू, पाहा नेमक काय आहे कारण.
शिवाजी चौकात पैशाच्या वादातून एकावर चाकूने प्राण घातक हल्ला
यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल.
यवतमाळ : पैशाच्या वादातून एका 55 वर्षीय व्यक्तीवर भर चौकात धारदार चाकूने प्राण घातक हल्ला करण्यात आला. यामध्ये संबंधितत व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजता च्या सुमारास शिवाजी चौक माळीपुरा येथे घडली.
अनिल बेलसरे (वय 55)राहणार चमेडिया नगर यवतमाळ असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जखमी हे आरटीओ ऑफिस मध्ये लायसन तयार करून देण्याचे काम करतात. दरम्यान लायसनचे जुने पैसे न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर फिर्यादीच्या पत्नीने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी महेश नेवारे सह एकावर गुन्हा दाखल केला.