पुढच्या महिन्यात ” तो ” बोहल्यावर चढणार होता; पण त्या आधीच त्याच्यासोबत होत्याचे नव्हते झाले.
दिवसाला अनेक अपघात होतात , त्याला कारण ही तशीच आहेत. त्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात, वेगावर नियंत्रण न राहणे यामुळे सुद्धा अनेक अपघात होतात. एका गाडी अपघात झाला तर अनेक गाड्या एकमेकांवर आदळतात.असाच एक भीषण अपघात झाला. बसण्याआधीच संसार मोडला, आदर्शचा अपघातात मृत्यू झाला.
गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या नवरदेवाचे एका क्षणात होत्याच नव्हत झालं ,ऐन दिवाळीत, महिनाभरावर लग्न आलं असताना हॉटेलमधून जेवण करून परतणाऱ्या एका युवकाचा कारच्या धडकेत दुर्देवी मत्यू झाला आहे. आदर्श विठ्ठल जाधव असं मयत युवकाचं नाव आहे,आदर्श हा आपल्या मित्रासोबत हैदराबाद रोडवरील दहिटणे फाट्याजवळील एका हॉटेलमधून जेवण करण्यासाठी गेला होता.
जेवण करून परतत असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये आदर्श आणि त्याचा मित्र दोघे जखमी झाले. या दोघा जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्मालयात हलवलं. मात्र, आदर्शचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. तर मयत आदर्श याचे रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करण्याचे टेंडर होते.
तर त्याचे पुढील महिन्यात लग्न होते अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. त्यामुळे लग्नात हात पिवळे होण्याआधीच आदर्श रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने जाधव कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.