शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा कला परिवाराच्या वतीने बाल कलाकारांच्या विविध गुणदर्शनाचा पुरस्कार वितरण
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वसुंधरा कला परिवारच्या वतीने बालकलाकारांच्या विविध गुणदर्शनाचा व सामाजिक कार्य पुरस्कार वितरण कार्यक्रम पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत कलागुण विकसित करणे शिक्षणाइतकेच महत्वाचे आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी, संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी व त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशानेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला पुणे शहर उपाध्यक्षा योगिता ताई गोसावी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मोठ्या संख्येने बालकलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिग्दर्शक व निर्माते प्रदीप गोगटे खास या कार्यक्रमासाठी मुंबईहून पुण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा मृणालिनी ताई वाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या
याचबरोबर पुण्यनगरी दैनिकचे राहुलजी लिमये, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ राजेंद्र भवाळकर, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रत्नाकर शेळके, सुप्रसिद्ध गायक प्रदीप कांबळे, मिमिक्री आर्टिस्ट मधुसूदन घाणेकर, लेखक सूर्यकांत पवार, पत्रकार मंगेश गांधी व राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे जितेंद्र नागवडे, वसुंधरा परिवारचे कार्याध्यक्ष महेश गोसावी इ मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बालकलाकारांना ट्रॉफी व गौरवप्रमानपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रज्ञेश गोसावी, अरुष मोघे, सई काळे, युगंधरा खालकर, सियोना मोरे, स्वरा गुरव, साईश्री कुलकर्णी, वरद कुलकर्णी, मृदांग लोहकरे, अर्पिता येवले, अनन्या नाशिककर, आराध्या जाधव, तनिष्का पवार, काव्या भालेराव, सौख्या जंगम, शर्वी मोटेगावकर, शर्वरी वीर, ऋषीराज पायगुडे, सम्राज्ञी सुरवसे, आराध्या मोरे, स्वरा गावंडे, अलोकी कुलकर्णी, सान्वि नंदवे, अन्वी खुळे या बालकलाकारांनी अप्रतिम नृत्य, नाट्यछटा व वादन यांचे सादरीकरण केले. स्वामी महावास्तूच्या पौर्णिमा यांनी सामाजिक कार्यासाठी गायकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
सीमा सुतार, वृषाली महाजन, ललिता सातपुते, प्रियंका धर्मट्टी, अंजली चव्हाण, प्राची जोशी, अस्मिता आपटे, देवयानी साळुंखे, साधना देशपांडे, अजय जोशी, पांडुरंग मोटे व उमेश सोनकांबळे या गायकांचा सामाजिक कार्यासाठी नेहमीच सहभाग असतो म्हणून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मिता मोघे, श्रध्दा देवळे, संध्या गावंडे, श्यामल मोरे व सर्व पालकांनी सहकार्य केले. अंजली चव्हाण यांनी अतिशय उत्तमरीत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्वांचे वसुंधरा कला परिवारच्या वतीने मनापासून खूप खूप धन्यवाद.