मोबाईल घेऊन पठ्ठ्या वाघाच्या मागे धावू लागला, पुढे काय झालं पाहाच. व्हिडिओ होतोय व्हायरल.
कोण कधी काय व्हायरल करेल याचा काही भरोसा नसतो. जंगलात सफारीला जातो त्यावेळेस आपण काळजी घेणं महत्त्वाचं असतं. यामध्ये आपल्यामुळे त्या वन्यजीवांना काही धोका होणार नाही, किंवा त्या वन्यजीवांमुळे आपल्याला काही धोका निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण तरीदेखील जंगल सफारी करत असताना काही जण अति उत्साहाने नको ते पाऊल उचलतात आणि मग त्यांना त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागतात अशीच काहीशी घटना एका जंगलामध्ये पाहायला मिळाली आहे.
भारतात जंगल सफारी करणे सर्वांनाच आवडत असतील पण जंगलात फिरायला जाणे काही वेळा धोकादायक ठरू शकते. लोक कधी कधी अशा चुका करतात की ते स्वतः सोबतच इतरांचा जीव देखील धोक्यात घालतात. भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिलं की – “हा व्हिडिओ चुकीच्या कारणाने व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांनाही व्याघ्र पर्यटनाचा फायदा होतो कारण त्यांचा घरखर्च यावर चालतो आणि प्राण्यांचंही संरक्षण होतं. पण काही लोकांच्या अशा कृतीने संपूर्ण व्यवस्थाच बदनाम होते. कृपया अशा गोष्टी जंगलात अजिबात करू नका आणि असं काही करणाऱ्या तुमच्या मित्रांनाही थांबवा.
यामध्ये एक जंगल आहे त्यामध्ये एक प्राणी उभा असून काही लोक समोर चालत असलेल्या वाघाचा व्हिडिओ बनवत आहेत आणि इतक्यातच एक व्यक्ती हातात फोन घेऊन वाघाचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्या वाघाच्या दिशेने पळताना दिसतो अशा वेळेस जर तो वाघ त्या व्यक्तीच्या दिशेने वळला असता आणि त्या व्यक्तीकडे धावून आला तर तो व्यक्ती आपला जीव देखील वाचू शकला नसता तो वाघ त्या व्यक्तीपासून खूप कमी अंतरावर होता जर वाघाने मागे बघितला असतं तर त्या व्यक्तीचं मात्र काही खरं नव्हतं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे या व्हिडिओला आतापर्यंत 43 हजार लोकांनी पसंती दाखवली आहे तसेच अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. यामध्ये काही जण म्हणतात की, ” या व्यक्तीला लाज वाटली पाहिजे. जो कोणी व्यक्ती आहे त्याचे फोटो सार्वजनिक करा.” तर दुसरा म्हणतो की, ” वाघ मागे फिरला की नाही ?” तसेच एकाने सांगितलं की, ” जंगल सफारी मध्ये लोकांना गाडीतून उतरून दिले जात नाही हा व्यक्ती तर वाघाच्या दिशेने धावत आहे दुसरा वाघ जर झुडपात लपलेला असता तर काय झालं असतं ?” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओला लोकांमार्फत येत आहे.