अभिमानास्पद : मुलं पोटात असताना तलाठी पदासाठी परीक्षा दिली, जेलर पदाच्या परीक्षेत यश मिळवलं.
एका स्त्रीसाठी आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आनंदाचा वेदनादायी असा क्षण म्हणजे तिची गर्भवस्ता असते. जितका आनंद एका बाळाला जन्म देण्यासाठी असतो, तितकाच संवेदना ते बाळाला जन्म देताना होत असतात. आपल्या घरात एक बाळ येणार म्हणून घरातलं वातावरण खूप आनंदी असतं. मात्र या बाळाला जन्म देताना या आईसोबत कुठलेही बरेवाईट होऊ नये याची चिंता प्रत्येकाला असते. नऊ महिने आईच्या पोटात बाळ वाढत असतं आणि या वेळी नाना विविध प्रकारचा त्रास ही जाणवत असतो.
मात्र हे सगळं काही बाजूला सारून या महिलेनं एक परीक्षा पास केली. या परीक्षेत उत्तीर्ण होतं त्यात थेट जेलर पदाच्या परीक्षेत एका चांगल्या अधिकाराच्या पदावरती पोहोचल्या. शिक्षण सुरू असतानाच त्यांचे लग्न झालं होतं. त्यांना चांगलं सासरही मिळालं मीरा यांना त्यांचे पती विषयी यांची मोठी साथ लाभली. लग्नानंतरही आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला होता आणि मूल पोटात असतानाच त्यांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली.
अवघ्या दहा दिवसाच्या मुलाला घेऊन 2010 साली तलाठी म्हणून एका खेडेगावात रुजू देखील झाल्यावर यानंतरही त्यांनी आपलं काम करत स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास केला. यावेळी त्यांनी जेलर पदासाठी परीक्षा दिल्या आणि त्यातही त्यांना यश मिळालं. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगाधिकारी मधल्या. सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून काम करतात. त्यांना दोन मुले देखील आहेत आणि त्यांच्या पतीचा त्यांना भक्कम साथ देखील आहे.
शिकण्याची जिद्द चिकाटी हे अंगी असलं की, आपल्याला आयुष्यात काहीही मार्ग सापडतात. आपण आकाशाला गवसणी घालू शकतो. कोल्हापुरातील कळंबा येथे राहणाऱ्या मीरा बाबर यांनी हेच सिद्ध करून दाखवला आहे. कळंबा या ठिकाणी तुरुंग अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, मात्र त्यांचा संघर्ष काही कमी नाही. या तरुण तुरुंगाधिकारी होण्यापर्यंत त्यांना अपार कष्ट करावे लागले. अगदी दहा महिन्याच्या बाळाला घेऊन असताना कामावर रूजू व्हावं लागलं. तर बाळ पोटात असताना त्यांना स्पर्धा परीक्षा ही द्यावे लागले. मात्र मीरा बावरे या कधीही मागे हटल्या नाही. त्या सतत प्रयत्न करतच राहिल्या आणि शेवटी यशस्वी देखील झाल्या.