मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणे ” तिला ” भवले.

शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी मुस्लीम समाजाविरुध्द तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. मुस्लिमांबद्दल त्यांनी ” मुसलमनाच्या लोकांना, या लांड्याना त्यांची लांडेगिरी दाखवून द्या आणि यांची लांडेगिरी छाटून टाका ” असे अपशब्द वापरले असून यामुळे हिंदू – मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे.
सदरचे वादग्रस्त वक्तव्य सदर महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, इम्पेरियल चौक, माळीवाडा. अहमदनगर. या ठिकाणी केले असल्याचे समोर आले आहे. दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगर येथे हिंदू समाजातर्फे लव जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळेस शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांनी मुस्लीम समाजाविरुध्द तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. याबाबत हमजा शाहिद शेख वय 19 वर्ष, धंदा – फिटरकाम, रा.- हातमपुरा अहमदनगर. याने समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली आहे.
त्यानुसार शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांच्या विरुध्द कलम 505/2 नुसार कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.