सोयगाव येथील पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी,
फर्दापूर, अजिंठा येथील नूतन पोलीस स्टेशनच्या कामाला लवकरच होणार सुरुवात – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
फर्दापूर येथे उभारण्यात येणार पोलीस वसाहत.
वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच तपास कामासाठी पोलीसांना अद्यावत सोयी मिळाव्यात यासाठी राज्यातील पोलीस स्टेशन हायटेक व सुसज्ज करण्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भर असून येत्या काळात पोलिसांना सर्वाधिक सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असेल असे प्रतिपादन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील नूतन पोलीस स्टेशन इमारत बांधकाम शुभारंभ प्रसंगी केले.
जवळपास 200 कोटी रुपयांच्या निधीतून तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती उभारल्या जात आहे. मात्र सोयगाव येथील पोलीस स्टेशन ईमारत उभारण्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
आज रविवार ( दि.12 ) रोजी सोयगाव पोलीस स्टेशन नूतन इमारत बांधकामाचा शुभारंभ मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, जिल्हा बँकेचे उपाध्याय अर्जुन पा. गाढे, एपीआय सुदाम सिरसाट, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रदीप नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, आमखेडा सरपंच गजानन ढगे, माजी जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, धृपताबाई सोनवणे, सुरेखा तायडे आदींची उपस्थिती होती.
फर्दापूर आणि अजिंठा येथील पोलीस स्टेशन इमारत बांधकामाला देखील लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात दिली. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा, बनोटी व सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील पोलीस चौकी उभारण्या संदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावे यासाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मतदारसंघात येत्या काही दिवसात दौरा असल्याची माहिती यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यावेळी मतदारसंघातील पोलीस विभागाशी निगडित सर्व विषय मार्गी लागतील असा विश्वास ना.अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
सोयगाव पोलीस स्टेशनचे कामकाज गेल्या 50 वर्षांपासून भाड्याच्या अतिशय कमी जागेत चालू होते. काम करायला पोलिसांचा उत्साह दिसून येत नव्हता, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यातून सोयगाव येथे उभारण्यात येणारी नूतन इमारत ही सर्व सोयींनी पूर्ण असेल, आता पोलिसांना येथे काम करतांना उत्साह वाढेल असा विश्वास पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी सोयगाव पोलीस स्टेशन ला भेट दिली होती. त्यावेळी येथील परिस्थिती पाहून येथे नवीन पोलीस स्टेशनची नितांत गरज असल्याचे दिसून आले. प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर निधीसाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला. त्यासोबतच पोलीस हाऊसिंग बोर्डाकडे देखील त्यांनी पाठपुरावा केला त्यामुळे प्राधान्याने या कामाला सुरुवात झाली. असे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री प्रसन्ना म्हणाले. या कामाबाबत आभार व्यक्त करीत श्री. प्रसन्ना यांनी फर्दापूर पोलीस वसाहत व पोलीस ठाण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
या इमारत बांधकाम साठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून सर्वसोयींनी पूर्ण एक वर्षात दोन मजली इमारत उभी राहणार आहे.
कार्यक्रमास न.प. तील शिवसेना गटनेता अक्षय काळे,नगरसेवक भगवान जोहरे,संदीप सुरडकर, गजानन कुडके, अशोक खेडकर,लतिफ शहा, तसेच कदीर शहा, विष्णू इंगळे, किशोर मापारी, राजू दुतोंडे, रउफ शेख, राजेंद्र घनघाव, बाबू ठेकेदार, सलीम पठाण, सिराज पठाण, श्रीराम चौधरी, राधेश्याम जाधव, सांडू मानसिंग,भरत राठोड, हिरा चव्हाण,रमेश गव्हाडे, कुणाल राजपूत,संजय आगे, फिरोज पठाण, भारत तायडे,आदींची उपस्थिती होती.