पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
आपल्याला राज्यांमध्ये पुन्हा जर निर्बंध नको असतील तर आपल्याला मास्क वापरावे लागेल आणि आपण जर लसीकरण केलेले नसेल तर लसीकरण करून घ्यावा लागेल आपण स्वतःहून शिस्त पाळायची आहे जेणेकरून कोरोना रोगाचा जास्त प्रसार होणार नाही असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या अत्यंत वाढत आहे आणि विशेषता म्हणजे मुंबईसारख्या शहरांमध्ये या रोगाचा प्रसार झपाट्याने होत चालला आहे आणि म्हणूनच राज्य सरकार आता सतर्क होताना आपल्याला पहायला दिसतंय या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या समितीची बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये काही विषयांवर चर्चा करण्यात आल्या. तर त्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणत आहेत की, गेल्या काही दिवसापासून कोरोना आकडेवाडी वाढताना दिसत आहे आणि त्यानुसार आणि वैद्यकीय तज्ञांच्या नुसार त्यात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे यामुळे शासन पुढच्या काही १५ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहे. त्याचा प्रसार करण्यासाठी राज्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
जर राज्यातील नागरिकांना हा कसलेही निर्बंध नको असतील तर त्यांनी स्वतःहून याबाबतची शिस्त पाळायची आहे. ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी मास्क वापरायचे आहे. ज्यांनी लसीकरण केले नसेल त्यांनी लसीकरण देखील करून घ्यायचे आहे. आपले दैनंदिन व्यवहारांमध्ये हात स्वच्छ धुवायचे आहेत तसेच सुरक्षित अंतर ठेवणे व आधीची कोविड रुग्णालय व्यवस्थित आहे का त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत. वैद्यकीय कर्मचारी आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घ्यावा. अशा प्रकारच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
राज्यातील कोविडचे चाचण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. प्रमाण वाढवण्यावर भर द्यावी नवीन असल्या संसर्ग क्षमतेवर लक्ष ठेवले पाहिजे कारण आता शाळा चालू होणार आहेत आणि जागतिक स्तरावर शाळा बाबत काय निर्णय घेतले आहेत तेथील मुलांना संसर्ग होत आहे का याबाबतची माहिती जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
नागरिकांना त्यांनी काही आवाहन देखील केले आहे तर ती आव्हान आवाहन कुठली आपण पाहू
- गर्दीच्या ठिकाणी मास आवर्जून वापरा
- 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढवा
- जेष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्या, बुस्टर डोस देखील घ्या.
- आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करून ठेवावी. ऑक्सिजन – औषधांचा साठा करून ठेवा.
- पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरतात त्या आजारांची लक्षणे ही कोरोना सारखीच असतात त्यामुळे डॉक्टरांनी चाचण्या करून घेण्यास सांगावे.
- ताप सर्दी घशात दुखत असल्यास चाचणी करा.
बैठकीच्या प्रारंभी डॉक्टर प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोबड संसार का बाबत काही माहिती दिली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील करणारा रुग्ण संख्या वाढतच चालली आहे मुंबई-ठाणे पुणे तसेच महानगरांमध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सहा टक्के तर राज्याचा तीन टक्के वर गेल्याचे ते म्हणाले तरी यामध्ये आपल्यालाच आपली काळजी घ्यायची असून सरकारने ठरवून दिलेल्या सूचनांचे आपल्याला पालन करायचा आहे