बायकोला पोलीस करण्यासाठी नवऱ्यानं विकलं घर-दार आणि शेती, नोकरी मिळताच बायकोने केले असे काही.
लग्नानंतर अनेक विवाहिता शिक्षण घेत असतात, चांगला अभ्यास करून यश ही मिळवतात त्यांच्या कुटुंबियांच त्यांना चांगल सहकार्य असत, यात सर्वात महत्वाची भूमिका ही पतीची असते, आपल्या पत्नीला अभ्यासाला वेळ मिळावा या करिता तो नेहमी तत्पर असतो, कारण पतीचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम असते .
असं म्हणतात प्रेम अंधळं असतं. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला भोवताली काय सुरू आहे याचं भानच नसतं. अन् जेव्हा तो भानावर येतो तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. असाच काहीसा प्रकार बिहारमधील एका तरुणासोबत घडला. बायकोला पोलीस बनवण्यासाठी त्याने आपलं घर आणि जमिन विकली. पण पोलीस होताच बायको त्याला सोडून प्रियकराजवळ गेली. आता हा तरुण पोलीस बायको विरोधात पोलिसांकडेच न्याय मागत आहे.
मात्र पुरुषांच्या बाजून कायदे कमी पडतात अस म्हंटल जात. आता या तरूणाला न्याय मिळतो का याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
नेमक हे प्रकरण काय आहे ?
बिहार मधील मिथून कुमार पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याच वेळी तो एका तरुणीच्या प्रेमात पडला. खरं तर ती देखील पोलीस भरतीची तयारी करत होती. बराच काळ ते दोघं लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिले. अन् अखेर कुटुंबीयांच्या संमतीनं त्यांनी लग्न केलं. मिथूनचं आपल्या बायकोवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याने बायकोला नोकरी मिळवून देण्यासाठी स्वत:ची जमीन आणि घर देखील विकलं. अखेर एका राजकीय नेत्याच्या ओळखीनं तिला नोकरी मिळाली. पण पोलीस होताच तिने आपल्या नवऱ्याला सोडून दिलं. आता तिने आपल्या नव्या प्रियकरासोबत संसार थाटला आहे. असा दावा मिथूननं केला आहे. दरम्यान या प्रकरणी त्याने पोलीस तक्रार केली असून बायको विरोधात आर्थिक फसवणूकीचा दावा केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत