ढगातून धो – धो पाऊस तर खाली नदीला पूर, पहा चितेची कशी निसर्गाने केली चेष्टा पहा बातमी सविस्तर.
गेल्या बऱ्याच दिवसापासून परतीचा पाऊस चालू आहे. यामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी पुराचे पाणी हे घरात घुसले आहे. सगळ्याच ठिकाणी पावसाचे प्रमाण हे खूप आहे त्यामुळे सगळ्याच छोट्या मोठ्या नद्यांना देखील पुराच स्वरूप प्राप्त झाले आहे. तर कित्येक ठिकाणी लोक वाहून देखील गेले आहेत.
मागच्या महिन्यामध्ये नाशिक मधील शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर येथे स्मशानभूमी आभारी काही नागरिकांनी सागाच्या पानांचा आधार घेत प्रेतावर अंतिम संस्कार केले होते. गुजरात सिमेपासुन अवघ्या दहा ते वीस फुटावर असलेले चंद्रपूर गाव या गावातील बागुल वस्तीवर दोन दिवसापूर्वी एका नागरिकाचे आकस्मित निधन झाले आणि त्यामुळे नागरिकांना भर पावसात सागाच्या पानांचा आधार घेत अंतिम संस्कार करावा लागला होता. अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे.
राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्मशानभूमी नसल्याने अडचणींना तोंड द्यावा लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असताना कन्नड तालुक्यातील अहमदाबाद या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने अडचण निर्माण झाली होती. आणि त्यामुळे नदीच्या पात्रात चितारचून ती पेटवली होती पण हा परतीचा पाऊस चालू असताना अचानकच त्या ठिकाणी पावसाचे आगमन झाले आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती नदी वाहू लागली.
त्यावेळेस तिथे असणाऱ्या नातेवाईकांना एकच चिंता होऊ लागली आणि ती म्हणजे या पावसामध्ये नदीला जे पाणी आले या पाण्यात जळती चिता वाहून गेली तर करायचं काय ? स्मशानभूमी नसल्यामुळे या लोकांना चिता का नदीपात्रात जाळावी लागली होती. पण सुदैवाने ते प्रेत वाहून नाही गेले आणि खूप मोठी घटना होता होता वाचली. लवकरात लवकर स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी अशी मागणी स्थानिकामधून होत आहे.