नगरच्या ” या ” आमदाराने करून दाखवले, मंत्रालयात आत्महत्याच्या हेतूने आलेल्या तरुणांना रोखले.
मंत्रालयाच्या सातवा मजल्यावर आत्महत्येचा प्रयत्न करत असलेल्या दोन तरुणांशी संवाद साधून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी त्या दोन तरुणांना आत्महत्येच्या निर्णयापासून परारूत्त केले आहे. मंगळवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास जवळपास एक तास हात थरार त्या ठिकाणी चालू होता.
सदरील दोन्हीही तरुण हे मराठवाड्यातील असून त्यापैकी एक युवराज चव्हाण असल्याची माहिती समजते. मराठा आरक्षण या विषयावरून यांनी हे पाऊल उचलल्याचे समजले पाहूया सविस्तर बातमी.
मराठा आरक्षणावरून दोन तरुणांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला एवढे दिवस उलटूनही मराठा आरक्षण बाबतीत कोणताही निर्णय लागला नाही आणि त्यामुळे अनेक जणांच्या निवडी होऊनही नियुक्ती मिळत नव्हत्या. आणि यामुळे कित्येकांची नोकरीची संधी सुद्धा हुकली आहे आणि याच विषयाला अनुसरून म्हणून या दोन तरुणांनी मंत्रालयाच्यावरून आत्महत्या करण्याचे ठरवले. ही गोष्ट निदर्शनास येतात अनेक जणांनी त्यांना रोखले पण हे दोघे कोणाचे ऐकत नव्हते.
मंत्रालयातील काम आटोपून आमदार लंके बाहेर पडत होते. त्याच वेळेस सातव्या मजल्याच्या छतावर दोन तरुण आत्महत्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांना समजले. आमदार लंके हे तातडीने मंत्रालयाच्या छतावर पोहोचले. पण हे दोन्हीही तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि जर कोणी जवळ यायचा प्रयत्न केला तर आम्ही खाली उडी मारू अशा प्रकारच्या धमक्या ते तरुण ओरडून देत होते. छतावर उपस्थित असल्यापैकी एका तरुणाचा मोबाईल नंबर मिळाल्याने आमदार लंके यांनी त्यांच्यासोबत मोबाईलवरून संपर्क साधला.
” मी तुमचा भाऊ आहे, तुम्हाला मी न्याय मिळवून देतो.” असं आमदार लंके यांनी त्या तरुणांना सांगितलं. आणि त्यानंतर त्या तरुणांनी आमदार लंके यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली. पण त्या तरुणांनी एक अट ठेवली या अटीमध्ये फक्त आमदार लंके यांनीच आमच्या जवळ यावं असं ते म्हणाले. यानंतर आमदार लंके त्यांच्याजवळ गेले व आत्महत्याबाबत विचारणा केली असता, मराठा आरक्षण रखडल्याने निवड होऊनही नियुक्ती मिळत नाहीये, आमची यामुळे नोकरीची संधी हुकली आहे. आम्ही वारंवार मंत्रालयात हेलपाटे मारली मात्र आमची कोणीही दखल घेतली नाही. आणि त्यामुळे आम्ही आत्महत्येच्या निर्णयावर आल्याचे या दोन तरुणांनी लंके यांना सांगितलं.
त्या दोन्ही तरुणांचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार लंके यांनी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईल वरून चर्चा केली. आणि तरुणांच्या मागणी संदर्भात मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. आमदार लंके यांच्या शिष्टाईला यश आले. तरुण छताच्या कठड्यावरून खाली उतरले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा विश्वास सोडला यानंतर या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.