धक्कादायक : ” दारूचा ग्लास का सांडला ” अस म्हणत मित्राने – मित्रासोबत केले असे काही.

मारामाऱ्या साठी अगदी शुल्लक कारण देखील खूप असतं. कारण की हिंजवडी परिसरात अशाच पद्धतीने एक खून झालाय.
दारूचा ग्लास सांडला आणि मित्राने जीव घेतला, कचर्याच्या ढिगार्यात सापडला त्याचा मृतदेह. हिंजवडी परिसरातील मान महाळुंगे रस्त्यावरील कचर्याच्या ढिगार्यात मृतदेह आढळून आला. या मृतदेहांची ओळख पटवण्यात हिजवडी पोलिसांना अखेर यश आले.
संबंधित व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला होता. कचरात आढळलेल्या व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून बालाजी असं नाव आहे. दारुचा ग्लास सांडला न झालेल्या किरकोळ वादातून आरोपी नीलेश धुमाळ याने लाठी काट्याने बेदम मारहाण केली व त्याचा खून केला असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाला.
बालाजी आणि निलेश हे बारच्या पाठीमागे बसून दारू पीत होते. दरम्यान बालाजी कडून ग्लास खाली सांडला याचा राग मनात धरून निलेश ने बालाजी चा खून केला व या खुनाचे पुरावे नष्ट केले. आणि हा मृतदेह कचर्याच्या ढिगार्यात सोडून दिला.
ही घटना पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. यामध्ये नीलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोन आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.