सोयगाव रस्त्यावर अपघात; दोन गंभीर जखमी एक किरकोळ, रिक्षा व मोटारसायकलचा झाला अपघात.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव रस्त्यावरील गवळणच्या नाल्याजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे सोयगाव कडून येणारी रिक्षा आणि जरंडीकडून सोयगावला जाणाऱ्या मोटारसायकलचा हा अपघात झाला आहे घटनेची माहिती मिळतात सोयगाव पोलिस घटनास्थळी हजर झाले होते अपघातातील जखमींना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
यातील जरंडी येथील तरुण एकनाथ उर्फ बबन शेनफडू तोरे व बबलू सीताराम उसरे हे मोटारसायकलवरुन सोयगाव जात होते यावेळी त्यांचा अपघात झाला या अपघातात दोघेही गंभीर झाले तसेच रिक्षा चालक भोला संतोष जाधव हा किरकोळ जखमी झाला आहे.
वरील जखमींना त ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेले बबन तोरे व बबलू उसरे यांना बुलढाणा व औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
दरम्यान अपघाताची नोंद सोयगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे,पो. कॉ. रवींद्र तायडे, रोकडे, अजय कोळी हे करीत आहेत.