वंशाला दिवा हवा होता पण लेकीचा जन्म झाला; अन्..

हा आपण आजवर कन्या भ्रूणहत्या सारख्या घटना घडताना पाहतो. मुलगा हवा म्हणून अनेक कुटुंब मुलीचा गर्भ हा पोटातूनच नष्ट करतात. प्रत्येकाला मुलगी हे ओझं वाटतं मुलगी एकीने एके दिवशी परक्याची होते त्यामुळे मुलीला पहिल्यापासूनच कुटुंबात दुय्यम स्थान दिलं जातं मुलांच्या बरोबरीन मुलीला कमी शिकवण, लवकर लग्न लावून देणे. त्याच बरोबर तिच्याकडे दुर्लक्ष करणार मुलांच्या बरोबरीने तिला घरातील गोष्टींमध्ये त्याचबरोबर संस्कृतीच्या नावाखाली अनेक मर्यादा घालणं त्याचबरोबर तिचा जन्म झाला तरी देखील एखादी दुःखद घटना घडावी अशा पद्धतीने वावरने अशा अनेक घटना घडत असतात आणि अश्यातच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
लोकेश नावाचा एका व्यक्तीचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते लग्नानंतर पहिल्यांदा त्याला मुलगी होती, त्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील मुलगीच होती, पण त्याला मुलगा हवा होता त्यानंतर तिसऱ्या वेळेस देखील त्याला मुलगी झाली तेव्हा तो ना खुश होता. ” मला मुलगा हवा आहे आणि जर मुलगा झाला नाही तर मी आत्महत्या करेन.” असं या लोकेशन मित्रांकडे बोलून देखील दाखवलं होतं. त्यावेळेस त्याच्या मित्रांनी त्याला समजावलं पण तरी देखील तो त्याच्या मतावर ठाम होता. तीन वर्षानंतर चौथ्यांदा त्याची पत्नी पुन्हा गर्भवती राहिली यावेळी मुलगा व्हावा अशी त्याची मनातून इच्छा होती. मात्र चौथ्या वेळेस देखील त्याच्या नशिबाने साथ दिली नाही चौथ्यांदा त्याला मुलगी झाली. पत्नीने मुलीला जन्म दिला आणि तिकडे लोकेशने गळफास घेऊन आपले जीवन संपवून टाकले लोकेशने उचललेल्या या निर्णयामुळे सगळ्यांना धक्का बसला होता.
याबद्दल मिळालेली माहिती अशी की, लोकेश नावाच्या या व्यक्तीचे गावात चांगले संबंध होते. कुणासोबत वाद देखील नव्हते आणि तसेच त्याची आर्थिक परिस्थिती देखील चांगली होती पण मुलाच्या हव्यासापोटी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले गावकरी बोलत आहेत. चौथ्यांदा पत्नीला रुग्णालयात दाखल केलं होतं आणि लोकेश हा एकटाच घरी होता. लोकेशची आई त्याच्या भावासोबत बाजूच्या घरात राहत होती. त्याची पत्नी रुग्णालयात असल्याकारणाने त्याची आई त्याला डबा घेऊन घरी गेली आणि त्यांनी पाहिले असता लोकेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले अशी माहिती पोलिसांनी दिली.
पत्नीने चौथ्यांना मुलीला जन्म दिल्यामुळे नैराश्यात जाऊन एका वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले वंशाला दिवा हवा हा त्याचा आग्रह होता आपण पाहतो की बऱ्याचदा मुलगा पाहिजे म्हणून गर्भातच मुलींचे हद्द केली जाते ही घटना कर्नाटक मध्ये घडली आहे. मुलगा पाहिजे हा हव्यास होता आणि त्या व्यक्तीला चौथ्यांदा पण मुलगी झाली आणि यातून नैराश्य येऊन त्याने आत्महत्या गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची पत्नी चौथ्या बाळाला म्हणजेच मुलीला जन्म देते आणि दुसऱ्या क्षणाला तो व्यक्ती लोकेश हा आपले जीवन संपवून टाकतो वंशाला दिवा पाहिजे हा हट्ट त्याच्या जीवाशी आला.