Crime Video : मुख्याध्यापक अश्लील भाषेत बोलला, म्हणून महिलेने भर रस्त्यात गाठून चपलेने काठीने धुतले.
मुख्यधापाक हा एक जबाबदार व्यक्ती असतो जो पूर्ण ज्ञान मंदिर चालवतो तो समाजात असा वापरत असेल तर मग यातून मुलांनी काय शिकाव,ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात धुलीवंदनाच्या दिवशी घडली आहे. तर ज्यांना या महिलेने मारहाण केली ते येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताडाळा येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत
मुल तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताडाळा येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरलं झाल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या या व्यक्तीच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या असल्याची माहिती आहे. ते उच्च शिक्षित असले तरी त्यांनी जो कारनामा केला आहे त्यामुळे त्यांच्यावर चिखलफेक होत आहे.हा मुख्यधापाक धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी ताडाळा गावात पोहोचले. त्याने पीडित महिलेला फोन केला आणि तिला गाठून एका महिलेला अश्लील शब्दात शिवीगाळ करत होता.
त्या महिलेला ही व्यक्ती गावातच असल्याची माहिती मिळाली. तो गावाच्या मुख्यमार्गावर येताच महिलेने त्याला गाठलं आणि त्याला आधी चपलने झोडपून काढलं. त्यानंतर तिने काठी घेतली आणि त्याची तुफान धुलाई केली. एका व्यक्तीने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण तिच्या रुद्रावतारापुढे तोही काही करु शकला नाही. यावेळी तिथे मोठी गर्दी जमली होती. तिथे उपस्थित असलेल्या एकाने या प्रकरणाचा व्हिडिओ काढला.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालं आहे.शिक्षकाकडे समाज सन्मानाने बघतो. आई-वडिलांनंतर सर्वात जास्त आदर हा शिक्षकाला दिला जातो. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलेल्या या घटनेमुळे शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात गेल्या दोन महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण शिक्षणाची बिकट परिस्थिती दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली होती. आता परत मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झालाने शिक्षण विभागावर टीकेची झोड उडाली आहे