29 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग, मंचर-भीमाशंकर रोडवरील घटनेचा थरारक Video आला समोर.
नाशिक बस जाळण्याच्या घटनेची झाली पुनरावृत्ती , त्या बस मध्ये होते २९ प्रवाशी, पाहा कुठे घडला हा धक्कादायक प्रकार,
काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये एक बस जळली होती यात अनेक जण आगीने होरपळून निघाले होते, ही घटना ताजी असतानाच प्रवासी बसला अचानक आग लागल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. अनेकदा यात काही प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागतोय, अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून बसला अचानक आग लागल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
कल्याणवरून भीमाशंकरला जाणारी ही प्रवासी बस चालली होती आणि अचानक या प्रवासी बसने पेट घेतला. मंचर-भीमाशंकर रोडवरील घोडेगावजवळच्या शिंदेवाडी इथे ही घटना घडली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व 29 प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बस आग लागल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आल्याचं दिसतं आहे. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आसपासचे नागरिक याठिकाणी पोहोचले. नागरिकांनी बसवर पाणी ओतून ही आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक सारखी घटना घडण्यापासून थोडक्यात वाचली आहे.
आपल्याकडे असे म्हंटले जाते कि, देव तारी त्याला कोणमारी अस म्हंटल जात , याची प्रचीती या घटनेत आली आहे. सुदैवाने कोणतही जीवित हानी झाली नाही. मात्र या घटना कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण महत्वाच आहे.