एका कपलने दारू पिऊन रस्त्यावरच घातला धिंगाणा; पहा बातमी सविस्तर.

नशेमध्ये टुन्न असलेल्या अनेक लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पहिलेच आहेत. अनेकदा नशेत अनेकजण आऊट ऑफ कंट्रोल होतात अश्या लोकांचा हायव्होल्टेज ड्रामाही व्हायरल होत असतो. सोशल मीडियावर असे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अशातच उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये तरुण तरुणीने नशेमध्ये गोंधळ केल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तरुण आणि महिला वीकेंडच्या सुट्टीसाठी मॉलमध्ये आले होते. तेथे दोघांनी दारू प्यायली आणि ते निघाले तेव्हा दोघेही सुरक्षारक्षकाशी बाचाबाची झाली. घटनास्थळी कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. तो व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला. सेक्टर-24 पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित कुमार यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री उशिराची आहे. मोदी मॉलजवळ काही वाद झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. याविषयी अधिक तपास सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात सुरक्षारक्षक आणि रहिवाशांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. नोएडातील सेक्टर-25 येथील मोदी मॉलमध्ये शनिवारी वीकेंड साजरा करण्यासाठी आलेल्या जोडप्याने सुरक्षारक्षकाला चोप दिला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मॉलबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. प्रकरण इतके मोठे झाले की पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. तरूण आणि महिला दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नोएडातील रात्री उशिरा पब आणि मॉल्समध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. गतवर्षी गार्डन गॅलेरिया येथील बारमध्ये एका तरुणाला सुरक्षारक्षकांनी बेदम मारहाण केली होती. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक नशेत काय करत असतात याचं त्यांचं त्यांनाच भान नसतं आणि व्हिडीओ लगेच इंटरमेटवर धुमाकूळ घालताना दिसतात.