शहरात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून बचाव कार्याला सुरुवात. पहा बातमी सविस्तर.
कुर्ल्यातील इमारतीमधील स्थानिक रहिवाशांनी अडकलेल्या महिलेला जीव धोक्यात घालून बचाव कार्य करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी संबंधित महिलेला एका दोरीच्या आणि कपड्याच्या सहाय्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे संबंधित महिलेला खाली घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना आगीचा धूर वाढताना दिसून आला.
मुंबईतील टिळकनगर रेल व्यू कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये भीषण आग लागली आहे. १३ मजल्याच्या या इमारतीमध्ये दुपारी २ च्या सुमारास १२ व्या मजल्यावरील एका घरात आग लागली आणि नंतर ती भडकली. या आगीमुळं त्या इमारतीमध्ये लोक अडकले आहेत.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. अग्निशमनदलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. इमारतीच्या मागील बाजूला दोन ते तीन व्यक्ती अडकले होते त्यांना देखील वाचवण्यात आलं आहे.
सर्वत्र धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. जीव वाचवण्यासाठी हे रहिवाशी खिडकीत येऊन तोंडाला ओला बोळा धरुन बसलेलेही पाहायला मिळाले. तर चौथ्या मजल्यावर अडकलेल्या एका महिलेला दोरीच्या सहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले.