अबब ! चक्क हॉटेलात घुसली भरधाव स्विफ्टकार; पाहा काय केली त्या हॉटेलची अवस्था, दोघांची प्रकृती गंभीर.

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.११..
कोणासोबत कधी काय होईल याचा काही भरोसा नसतो, आता सर्व काही ठीक असताना दुसर्या सेकंदाला काय होईल सांगता येत नाही. असच काहीसे सदरील हॉटेल मालकासोबत घडले आहे. त्याने विचार पण केला नसेल कि आपल्या हॉटेल मध्ये ग्राहक येत असतात पण चक्क गाडीच हॉटेल मध्ये येईल. सोयगाव कडे जाणारी भरधाव स्विफ्टकार थेट हॉटेलात शिरल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
सदरील हि घटना शनिवारी बहुलखेडा बस स्थानकावर घडली आहे. या घटनेमुळे बहुलखेड्यात तणाव निर्माण झाला होता. या मध्ये गंभीर जखमी झालेल्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोयगावकडे जाणारी भरधाव स्विफ्टकार बहुलखेडा बस स्थानकावर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शिरल्याने त्यात हॉटेल व्यावसायिक महिला आशा जाधव (वय ४३) आणि हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी आलेली नऊ वर्षीय बालिका सखू राठोड हे दोन्ही गंभीर जखमी झाल्या आहे.
त्यांना अपघात होताच तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेत आशा जाधव यांच्या पायांना गंभीर दुखापत झालेली असून सखू राठोड या बालिकेच्या छातीला मार लागलेला आहे. या घटनेमुळे बहुलखेडा गावात गोंधळ उडाला होता…
हॉटेल साठी आलेल्या या अनोळख्या पाहुण्याने मात्र दोनजणांना जखमी करून गेला आहे. आपण देखील रस्त्याने गाडी चालवत असाल तर रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या मोठ्या हॉटेल अथवा तिथे असणाऱ्या लोकांचा विचार करा. आणि आपली वाहने सावकाश चालवा.